परतूर येथे ५५.२० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 01:07 AM2019-04-19T01:07:23+5:302019-04-19T01:07:57+5:30

परतूर विधानसभा मतदार संघात शांततेत मतदान पार पडले असून, वृध्द, अपंगांनी भर उन्हात मतदानाचा हक्क बजावला.

At Partur, polling was 55.20 percent | परतूर येथे ५५.२० टक्के मतदान

परतूर येथे ५५.२० टक्के मतदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : परतूर विधानसभा मतदार संघात शांततेत मतदान पार पडले असून, वृध्द, अपंगांनी भर उन्हात मतदानाचा हक्क बजावला. परतूरमध्ये ६ वाजेपर्यंत ५५.२० टक्के मतदान झाले होते.
परभणी लोकसभा मतदार संघासाठी गुरुवारी मतदान झाले. यासाठी परतूर विधानसभा मतदार संघातील ३२६ मतदार केंद्रावर मतदान पार पडले. २ लाख ९२ हजार ६२९ मतदार असलेल्या परतूरमध्ये उन्हाच्या तीव्रतेने सकाळीच मतदान केंद्रांवर नागरिकांनी हजेरी लावली होती. परिणामी, सकाळी ९ वाजेपर्यंत २२ टक्के मतदान झाले तर सांयकाळी ६ वाजेपर्यंत ५५.२० टक्के मतदान झाले होते.
भर उन्हात वृध्द, अपंगांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. अपंगासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था देखील करण्यात आली होती.
महाविद्यालय व विविध शाळातील दीडशे विद्यार्थ्यांची बुथवर विशेष स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, सहाय्यक निवडणूक अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार राजेभाऊ कदम, सुमन मोरे, नायब तहसीलदार विजय दावणगावकर, धनश्री भालचीम, सुरेखा कुटूरकर, नोडल अधिकारी प्रेरणा हरबडे, रवींद्र हेलगड, अनिल शिंगाडे, संजय कास्तोडे, आशोक टाकरस, कृष्णा परांडे, कल्याण बागल आदींनी मतदान प्रक्रिया पार पडण्यासाठी परिश्रम घेतले.
पोलीस अधिकारी सोपान बांगर यांनी सर्वत्र शांततेत मतदान झाल्याचे सांगितले.
रांजणीत एक तास मशीन बंद
रांजणी : घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील मतदान केंद्र क्र. ०६५ मध्ये सकाळी दहा वाजेच्या सुमारास ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला होता. यामुळे सुमारे १ तास मशीन बंद पडले होते. त्यानंतर येथील मतदारांना १ तास मतदानासाठी वाढवून देण्यात आला असल्याचे केंद्राध्यक्षांनी सांगितले.
घनसावंगीत ६२.०० टक्के मतदान
घनसावंगी : घनसावंगी विधानसभा मतदार संघात गुरूवारी सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून येत होता. रांजणी वगळता इतर ठिकाणी सुरळीत मतदान पार पडले असून या विधानसभा मतदार संघात ६२ टक्के मतदान झाल्याचे तहसीलदारांनी सांगितले.
घनसावंगी विधानसभा मतदार संघात घनसावंगी तालुक्यातील ११७, अंबड तालुक्यातील ५३ तर जालना तालुक्यातील ४२ अशी एकूण २१२ गावे येतात. यात एकूण ३ लाख ७ हजार ६२ मतदार आहेत. यापैकी १ लाख ९० हजार ८७२ जणांनी मतदानाचा हक्क बजावला असून, सायंकाळी पर्यंत ६२ टक्क्याच्या जवळपास मतदान झाले होते.

Web Title: At Partur, polling was 55.20 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.