अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस जशास तसे उत्तर देईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:56 AM2018-11-18T00:56:36+5:302018-11-18T00:56:49+5:30

बदनापूर तालुक्यातील चितोडा येथील राष्ट्रवादी कॉग्रेसचे कार्यकर्ते भीमराव डिघे यांच्यावर हल्ला करणाऱ्या भाजपाच्या गुंडावर पोलिसांनी चोवीस तासाच्या आत अटक करा अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस जशास तसे उत्तर देईल असा इशारा विधान सभेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी श्निवारी येथे दिला

Otherwise, the NCP will respond by the same | अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस जशास तसे उत्तर देईल

अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस जशास तसे उत्तर देईल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : बदनापूर तालुक्यातील चितोडा येथील राष्ट्रवादी कॉग्रेसचे कार्यकर्ते भीमराव डिघे यांच्यावर हल्ला करणाऱ्या भाजपाच्या गुंडावर पोलिसांनी चोवीस तासाच्या आत अटक करा अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस जशास तसे उत्तर देईल असा इशारा विधान सभेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी श्निवारी येथे दिला.
धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भीमराव डिघे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी जालन्यात आले होते. यावेळी त्यांनी रूग्णालयास भेट देऊन चर्चा केली. यावेळी आ. राजेश टोपे, बबलू चौधरी, उपनराध्यक्ष राजेश राऊत, बाळासाहेब वाकुळीणीकर, अ‍ॅड संजय काळबांडे याच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदधिकाºयाची उपस्थिती होती.
१२ नोव्हेंबर रोजी भीमराव डिघे यांच्यावर जालना शहरात आ. नारायण कुचे यांचा भाचा दीपक डोंगरे यांच्यासह त्यांच्या साथीदाराने प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केल्याचा आरोप जमखी भीमराव डिघे यांनी केला आहे.
यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या पदाधिका-यात चांगलेच राजकारण तापले आहे. कालच हल्लेखोरांचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसने बदानापूर येथे रास्तारोको आंदोलन करुन शासनाचा निषेध केला होता.
शनिवारी विधानसभेचे विरोध पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सायंकाळी जखमी भीमराव डिघे यांनी पंधरा मिनिटे विचारपूरस केली. त्यांच्या आईशीही संवाद साधला.
त्यानंतर रग्णालयातून बाहेर आल्यानंतर मुंडे यांनी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्याशी मोबाईलवर संपर्क करुन याबाबत आरोपींना अटक का केली नाही. याबाबत धारेवर धरत जाब विचारला. चोवीस तासात आरोपींना अटक करा अन्यथा आम्हाला पण आमच्या पध्दतीने राडा करता येतो. असा दम पोलीस अधीक्षकांना भरल्याने उपस्थित आवाक् झाले.

Web Title: Otherwise, the NCP will respond by the same

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.