चंदनझिऱ्याजवळ ट्रकच्या धडकेत एक ठार तर तिघे जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 12:54 AM2019-02-06T00:54:40+5:302019-02-06T00:55:12+5:30

भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला.

One killed and three injured in a truck crash near Chandanzira | चंदनझिऱ्याजवळ ट्रकच्या धडकेत एक ठार तर तिघे जण जखमी

चंदनझिऱ्याजवळ ट्रकच्या धडकेत एक ठार तर तिघे जण जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंदनझिरा : भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला. भोकरदन चौफुलीकडून औरंगाबाद चौफुलीकडे जाणाºया वळण रस्त्यावर मंगळवारी (दि.५) दुपारी हा अपघात घडला. गणेश हरिभाऊ जाधव (५०, रा. सुंदरनबर, चंदनझिरा) असे मृताचे नाव आहे.
गणेश जाधव यांचे चंदनझिरा परिसरात शेत आहे. जाधव हे दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास नवीन औद्योगिक वसाहतीच्या परिसरात असलेल्या शेतात पाणी देण्यासाठी नातू साईनाथ कैलास भोसले (५) यास घेऊन लुणावरून जात होते. त्याचवेळी राजूर चौफुलीकडून भरधाव येणा-या ट्रक (क्र. सी. जी. ०७. बी. एफ. ४१८८) ने लुनाला जोरदार धडक दिली.
या अपघातात गणेश जाधव जागीच ठार झाले तर नातू साईनाथ भोसले दूर फेकला गेल्याने जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली. दरम्यान, ट्रक चालक घटनास्थळावरुन फरार झाला असून, त्याच्याविरुध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. कॉन्स्टेबल कांबळे तपास करत आहेत.

Web Title: One killed and three injured in a truck crash near Chandanzira

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.