अपघातात एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 12:02 AM2019-06-28T00:02:14+5:302019-06-28T00:02:31+5:30

भरधाव ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.

One dies in an accident | अपघातात एकाचा मृत्यू

अपघातात एकाचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री : भरधाव ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात गुरूवारी दुपारी अंबड- वडीगोद्री रस्त्यावरील शहापूर गावाजवळ घडला. भाऊसाहेब नाना बेढे (रा. पाथरवाला खुर्द) असे मयताचे नाव आहे.
अंबड तालुक्यातील पाथरवाला खुर्द येथील भाऊसाहेब नाना बेढे (४०) हे गुरूवारी दुपारी दुचाकीवरून (क्र.एम.एच.२०- बी.आर.७०७५) घराकडे जात होते. त्यांची दुचाकी शहापूरजवळ येताच समोरून येणाऱ्या ट्रकने (क्र. एम. एच. १६- सी. सी. ७०७७) जोराची धडक दिली. या धडकेत भाऊसाहेब बेढे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. अपघाताला दोन तास झाल्यानंतरही पोलीस घटनास्थळी हजर न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी अचानक रास्तारोको आंदोलन केले. आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. गोंदी ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. यानंतर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.

Web Title: One dies in an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.