दिंडी मार्गासाठी चोरीच्या वाळूचा वापर करणाऱ्या कंपनीस ६९ लाखाच्या दंडाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 07:26 PM2019-02-13T19:26:37+5:302019-02-13T19:28:45+5:30

तहसील कार्यालयाने वाळूच्या बाजारमुल्याच्या पाच पट दंडाची नोटीस बजावली आहे.

Notice of fine of Rs 69 lakh for company using stolen sand for Dindi route | दिंडी मार्गासाठी चोरीच्या वाळूचा वापर करणाऱ्या कंपनीस ६९ लाखाच्या दंडाची नोटीस

दिंडी मार्गासाठी चोरीच्या वाळूचा वापर करणाऱ्या कंपनीस ६९ लाखाच्या दंडाची नोटीस

Next

परतूर (जालना ) : बहुचर्चित शेगाव ते पंढरपूर दिंडी मार्गासाठी चोरीची वाळू वापरणाऱ्या मेघा इंजिनीयरींग अ‍ॅन्ड ईन्फास्ट्रक्चर्स या कंपनीला तहसील कार्यालयाने बाजारमुल्याच्या पाच पट दंडाची नोटीस बजावली आहे. ही दंडाची रक्कम जवळपास ६९ लाख रूपयाची आहे. 

हैदराबाद येथील मेघा इंजिनीयरींग अ‍ॅन्ड ईन्फास्ट्रक्चर्स या कंपनीला  दिंडी मार्गासाठी लागणारे साहित्य पुरविण्याचे काम दिले आहे. यासाठी सदर कंपनीने परतूर तालुक्यातील एकरूखा शिवारात आपला प्लांट उभारला आहे. मात्र, संबधीत एजन्सी गोदावरी पात्रातून चोरी झालेल्या वाळूचा वापर रस्त्याच्या कामासाठी करत असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती. यामुळे तहसीलदारांच्या पथकाने कंपनीच्या प्लांटवर जाऊन पाहणी केली. यावेळी हा प्रकार उघडकीस आला. यानंतर वाळूसाठयाचे मोजमाप करून सदरील कंपनीस ६९ लाखाच्या दंड भरण्याची नोटीस तहसील कार्यालयाने बजावली आहे. 

Web Title: Notice of fine of Rs 69 lakh for company using stolen sand for Dindi route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.