पारडगावला वृद्ध इसमाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 01:15 AM2018-05-22T01:15:34+5:302018-05-22T01:15:34+5:30

घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथे एका इसमाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना सोमावारी सकाळी उघडकीस आली.

The murder of old man in Paradgala | पारडगावला वृद्ध इसमाची हत्या

पारडगावला वृद्ध इसमाची हत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पारडगाव : घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथे एका इसमाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना सोमावारी सकाळी उघडकीस आली. परतूर येथील रहिवासी असलेले अंकुश गायकवाड (७४) हे रविवारी पारडगाव येथे आठवडीबजारात शेळ्या आणण्यासाठी गेले होते. ते रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने त्यांचा शोध नातेवाईकांनी घेतला. सोमवारी सकाळी अंकुश गायकवाड यांचा मुलगा लक्ष्मण गायकवाड हा वडिलांचा शोध घेण्यासाठी पारडगाव शिवारात गेला असता त्याला तेथे त्याच्या वडिलांचा मृतदेह अत्यंत छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. याची माहिती त्याने लगेचच घनसावंगी पोलिसांना दिली. माहिती मिळताच घनसावंगी ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब पवार, उपनिरीक्षक जे.बी.पुरी, जमादार जी.जी. मदन हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने खुन्याचा माग काढण्यासाठी श्वानपथकाला पाचारण केले. मात्र, त्याचा उपयोग झालेला नाही. मयत अंकुश गायकवाड यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रांजणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. या घटनने परिसरात खळबळ उडाली आहे. ही हत्या नेमकी कोणत्या कारणास्तव झाली, याचा अद्याप शोध लागला नसून, या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जे.बी. पुरी हे करीत आहेत.

Web Title: The murder of old man in Paradgala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.