मोटारसायकल चोर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 01:04 AM2018-12-07T01:04:20+5:302018-12-07T01:04:36+5:30

मोटार सायकलची चोरी करून त्या विक्री करणाऱ्या सुंदर सखूसिंग राजपूत या २५ वर्ष वयाच्या तरूणास अटक करून त्याच्याकडून तीन मोटार सायकल जप्त केल्या.

Motorbike thief arrested | मोटारसायकल चोर जेरबंद

मोटारसायकल चोर जेरबंद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील विविध भागातून मोटार सायकलची चोरी करून त्या विक्री करणाऱ्या सुंदर सखूसिंग राजपूत या २५ वर्ष वयाच्या तरूणास अटक करून त्याच्याकडून तीन मोटार सायकल जप्त केल्या. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने गुरूवारी केली.
गेल्या काही दिवसांपासून सुंदर राजपूत हा चोरीच्या मोटार सायकलवर फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरीक्षक जयसिंग परदेशी यांना सूचना देऊन राजपूतवर पाळत ठेवण्याचे सांगितले. गुरूवारी सुंदर राजपूत हा मोदीखान्यात असल्याची माहिती मिळाल्यावरून जयसिंग परदेशी व त्यांच्या सहका-यांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याच्याकडून तीन मोटार सायकली जप्त केल्या. या तिन्ही मोटार सायकल सुंदरने रेल्वे स्थानक परिसरात दडवून ठेवल्या होत्या.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केल्याचे गौर म्हणाले. यावेळी कैलास कुरेवाड, गोकुळसिंग कायटे, प्रशांत देशमुख, विनोद गडदे, अंबादास साबळे, रंजित वैराळ, हिरामण फलटणकर, सागर बाविस्कर यांनी प्रयत्न केले.
या आरोपीकडून शहरातील आणखी दुचाकी चोरीची प्रकरणे उघडकीस येणार असल्याची माहिती गौर यांनी दिली. त्यादृष्टीने आम्ही कसुन चौकशी करत आहोत.

Web Title: Motorbike thief arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.