घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अटकेत   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 07:54 PM2019-02-06T19:54:34+5:302019-02-06T19:55:16+5:30

तालुक्यातील घोटन गावी पीडिता आजी-आजोबा व वडिलांसोबत राहते शेतातील घरात राहते.

Minor girl raped in the house; accused arrested | घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अटकेत   

घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अटकेत   

Next

बदनापूर (जालना ) :  तालुक्यातील घोटन या गावातील आठवीत शिकणाऱ्या एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर घरात घुसून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी  सोपान काजलकर (२५ ) यास पोलिसांनी अटक केली आहे. 

तालुक्यातील घोटन गावी पीडिता आजी-आजोबा व वडिलांसोबत राहते शेतातील घरात राहते. शनिवारी (दि. 2) तिचे आजी-आजोबा नगरला तर वडील जालना येथे कामानिमित्त गेले होते. सायंकाळी 7 ते 8 वाजेच्या सुमारास पिडीता घरात एकटीच अभ्यास करत होती. यावेळी शेजारी राहणारा सोपान काजलकर हा घरात घुसला व पिडीतेवर अत्याचार केला. दरम्यान, सोपान पिडीतेला या आधीसुद्धा रस्ता आडवून छेडत असल्याचे पुढे आले आहे. 

या प्रकरणी सोपान विठ्ठल काजलकर ( रा. घोटन) याच्या विरोधात बलात्कार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सहा पोनि पी एस बोलकर हे करत आहेत.

Web Title: Minor girl raped in the house; accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.