वसुलीच्या नावाखाली आठवडी बाजारात लूट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 12:58 AM2018-04-16T00:58:02+5:302018-04-16T00:58:02+5:30

बाजारात पालिकेकडून कुठल्याही सुविधा दिल्या जात नसल्या तरी बाजार भाडेपट्टी वसुलीच्या नावाखाली विक्रेत्यांची लूट सुरू आहे. भाडेपट्टी वसुली करणाºया ठेकेदाराकडून अनेकदा पैसे घेऊन पावती दिली जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

Looted in the market in the name of recovery! | वसुलीच्या नावाखाली आठवडी बाजारात लूट !

वसुलीच्या नावाखाली आठवडी बाजारात लूट !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जुना जालन्यातील रेल्वेस्थानक रस्त्यावर रविवारी भरणाऱ्या बाजारात ग्रामीण भागातून शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी आणतात. बाजारात पालिकेकडून कुठल्याही सुविधा दिल्या जात नसल्या तरी बाजार भाडेपट्टी वसुलीच्या नावाखाली विक्रेत्यांची लूट सुरू आहे. भाडेपट्टी वसुली करणाºया ठेकेदाराकडून अनेकदा पैसे घेऊन पावती दिली जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
जुना जालन्यातील गांधीचमन ते रेल्वेस्थानक रस्त्यावरील आठवडी बाजारात आजूबाजूच्या गावातील शेतकरी थेट ताजा भाजीपला विक्रीसाठी आणतात. शेतकरी योग्य दरात भाजीपाला देत असल्याने शहरातील नोकरदार वर्ग शेतक-यां कडून भाजीपाला खरेदीस प्राधान्य देतात. स्थानिक विक्रेतेही नेहमीच्या ठिकाणांऐजवी रविवारी बाजारात भाजीपाला विक्री करतात. सुमारे चारशेंवर विक्रेते या बाजारा भाजीपाला, किराणा, फळे व अन्य साहित्य विक्री करतात. अनेकदा स्थानिक विक्रेते शेतक-यासोबत जागेवरून वाद घालतात. मोक्याच्या जागी शेतक-यांना भाजीपाला विक्रीसाठी बसू दिले जात नाही. त्यामुळे शेतकरी जागा मिळेल तिथे बसतात. असे असतानाही नगरपालिकेच्यावतीने प्रत्येक विक्रेत्यांकडून ठेकेदारामार्फत तीस रुपये बाजार भाडेपट्टी वसुली केली जाते. ठेकेदामार्फत वसुलीसाठी बाजारात येणा-या कर्मचा-यांकडून बहुतांश शेतकरी विक्रेत्यांना कुठलीही पावती न देता तीस रुपये घेतले जातात. भाडेपट्टीची वसुली करणाºया विक्रेत्याचे नाव पावतीवर टाकले जात नाही. याबाबत विचारणा केल्यास वसुलीसाठी येणारे कर्मचारी दमदाटी करतात.
उगाच वाद नको म्हणून ग्रामीण भागातले शेतकरी निमूटपणे पैसे देतात. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे एका विक्रेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. लालबाग परिसरात बुधवारी भरणाºया आठवडी बाजारातही अशाच पद्धतीने लूट सुरू आहे.
रेल्वेस्थानक रस्त्यावर भरणारा रविवार बाजार अनधिकृत असल्याचा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे. सुरुवातीला नगरपालिका क्रीडा संकुलात भरणारा हा बाजार अनधिकृत असल्याचे सांगत पालिका प्रशासनाने उठवून दिला होता. बाजार अनधिकृतरीत्या भरवला जात असेल तर मग ठेकेदारामार्फत भाडेपट्टी वसुली कशी केली जाते, अशा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

Web Title: Looted in the market in the name of recovery!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.