आयटीआयमध्ये ‘तंत्र’चा कुंभमेळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:59 AM2019-01-17T00:59:33+5:302019-01-17T00:59:52+5:30

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत बुधवारी जिल्ह्यातील आठही आयटीआयच्या विद्यार्थ्यांचा तंत्र मेळावा आयोजित केला होता.

Kumbh Mela of 'Technique' in ITI | आयटीआयमध्ये ‘तंत्र’चा कुंभमेळा

आयटीआयमध्ये ‘तंत्र’चा कुंभमेळा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत बुधवारी जिल्ह्यातील आठही आयटीआयच्या विद्यार्थ्यांचा तंत्र मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अनेक लक्षवेधी प्रकल्पांचे कौतुक जालन्यातील उद्योजकांनी केले. तसेच विद्यार्थ्यांना आयटीआय करतानाच रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
मेळाव्याचे उद्घाटन उद्योजक सुनील रायठठ्ठा यांनी केले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मुकुंद मंत्री, घनशाम गोयल, गणेश बियाणी, आर.आर. पाटणी, जितेंद्र राठी, अविनाश देशपांडे आणि भुसारे तसेच प्राचार्य देविदास राठोड यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक राठोड यांनी केले, ते म्हणाले की, आय टीआयच्या माध्यमातून कौशल्य प्रदान पिढी निर्माण करण्यात येत आहे. आजचे युग हे कौशल्यावर आधारित आहे.
यावेळी उद्योजक रायठठ्ठा यांनी सांगितले की, आम्ही ज्यावेळी उद्योग सुरू केले, त्यावेळी आम्हाला एवढे मार्गदर्शन मिळाले नाही. परंतु तुम्ही नशीबवान आहात, असे सांगून आय टीआय करताना अनेकांना विविध उद्योगात प्रत्यक्ष काम करण्याची संधी दिली जाईल असे आश्वासन दिले. यावेळी मुकुंद मंत्री यांनीही मार्गदर्शन केले.
या प्रदशर्नात जालना येथील विद्यार्थ्यांनी एनर्जी सेव्हर स्ट्रीट, भोकरदन आयटीआयने गतीज उर्जेतून विद्युत उर्जा तयार करणे, मंठा आय टीआयच्या विद्यार्थ्यांनी सायकल आॅपरेटेड वॉटर पंप हा प्रयोग सादर केला. त्या तिन्ही प्रयोगांची उत्कृष्ट प्रयोग म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.

Web Title: Kumbh Mela of 'Technique' in ITI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.