दोन वर्षापासून फरार गुन्हेगार जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 12:40 AM2019-03-12T00:40:46+5:302019-03-12T00:41:05+5:30

सदर बाजार परिसरात घरफोडीच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी सागरसिंग फंट्यासिंग अंधरेले (रा. गुरुगोविंदसिंगनगर) याचा एडीएसच्या पथकाने पाठलाग करुन सोमवारी मुसक्या आवळल्या

The juvenile absconding has been absconding since two years | दोन वर्षापासून फरार गुन्हेगार जेरबंद

दोन वर्षापासून फरार गुन्हेगार जेरबंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील सदर बाजार परिसरात घरफोडीच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी सागरसिंग फंट्यासिंग अंधरेले (रा. गुरुगोविंदसिंगनगर) याचा एडीएसच्या पथकाने पाठलाग करुन सोमवारी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून दोन मोटरसायकल, एक इंडिका कार असा मुद्देमाल जप्त केला.
आरोपी सागरसिंग याने आपल्या साथीदारांच्या मदतीने सदर बाजार परिसरात घरफोडी, दुचाकी, चारचाकी गाड्या चोरी केल्या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. मात्र, दोन वर्षापासून सागरसिंग पोलिसांना गुंगारा देत होता. सोमवारी सकाळी एडीएसच्या पथकाला माहिती मिळाली की सागरससिंग गुरुगोविंदसिंगनगर येथे असल्याची माहिती मिळताच एडीएसच्या पथकाने परिसरात छापा मारला. मात्र, पोलीस असल्याचे कळताच त्याने परिसरातील नाल्यातून धूम ठोकली. पोलिसांनी पाठलाग करुन त्याला अटक केली.
पोलिस खाक्या दाखवताच त्याने साथीदारांच्या मदतीने शहरात आणि परभरणी, जळगाव आदी ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एडीएसचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, पोहेकॉ नंदकिशोर कामे, संदीप चिंचोले, राजू पवार यांनी ही कामगीरी केली.

Web Title: The juvenile absconding has been absconding since two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.