बसच्या धडकेत एक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:37 AM2019-02-21T00:37:20+5:302019-02-21T00:37:27+5:30

अंबड शहागड येथील पैठण फाट्यावर एका दुचाकी स्वाराला बसने उडवल्याने ट्रकखाली येऊन एकजण जागीच ठार झाल्ल्याची घटना बुधवारी दुपारी ३ वाजता घडली.

Just hit the spot on the spot | बसच्या धडकेत एक जागीच ठार

बसच्या धडकेत एक जागीच ठार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड : अंबड शहागड येथील पैठण फाट्यावर एका दुचाकी स्वाराला बसने उडवल्याने ट्रकखाली येऊन एकजण जागीच ठार झाल्ल्याची घटना बुधवारी दुपारी ३ वाजता घडली.
आपेगाव येथील माजी सरपंच गुलाबराव जनार्दन चौधरी हे (एम.एच.१६.एक्स. ३७४ ) दुचाकीवरून पैठण फाट्यावर महामार्गावर वळून शहागडकडे जात असताना, बीडहून -औरंगाबादकडे भरधाव जाणारी तुळजापूर -औरंगाबाद (एम.एच.११.बीएल. ९३६६) या बसने जोराची धडक दिली. धडक इतकी जोराची होती की, दुचाकीस्वार चौधरी उडून राष्ट्रीय महामार्गाच्या दुसऱ्या बाजूस रस्ता दुभाजकापलीकडे फेकले गेले. दरम्यान दुस-या बाजूने औरंगाबादहून -बीडकडे जाणाºया ट्रक (एच.आर.७३.ए.७३८४) चालकाला काही समजण्याअगोदर समोरच्या चाकाखाली आले. त्यामुळे माजी सरपंच गुलाबराव चौधरी (५०) यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान दुचाकी बसच्या खाली अडकल्याने शंभर मीटर पर्यंत फरपटत गेली असता पेट्रोल व रोडच्या घर्षणाने दुचाकीच्या पेट्रोल टाकीचा मोठा स्पोट होऊन जळून खाक झाली. रहदारीच्या महामार्गावरील घटना असल्याने जवळील व्यावसायिक मदतीला धावून आले. दुचाकी विझवण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यानच्या धावपळीत बसचालक व ट्रकचालक घटनास्थावरून पसार झाले. अपघाताची माहिती मिळताच गोंदी व शहागड पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले होते.

Web Title: Just hit the spot on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.