ज्युनिअर जालनाचे ग्रॅण्ड फिनाले उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:26 AM2018-02-20T00:26:57+5:302018-02-20T00:27:05+5:30

लोकमत टाईम्स कॅम्पस क्लब क्रिएटिव्ह ग्रुप, व्हेन्यू पार्टनर हॉटेल अमित यांच्या संयुक्त विद्यमाने जालना शहरात घेण्यात आलेल्या ज्युनिअर जालना स्पर्धेस प्रचंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचे ग्रॅण्ड फायनल रविवारी अमित हॉटेलमध्ये उत्साही वातावरण झाले.

Junior Jalna's Grand Finale Enthusiasts | ज्युनिअर जालनाचे ग्रॅण्ड फिनाले उत्साहात

ज्युनिअर जालनाचे ग्रॅण्ड फिनाले उत्साहात

googlenewsNext

जालना : लोकमत टाईम्स कॅम्पस क्लब क्रिएटिव्ह ग्रुप, व्हेन्यू पार्टनर हॉटेल अमित यांच्या संयुक्त विद्यमाने जालना शहरात घेण्यात आलेल्या ज्युनिअर जालना स्पर्धेस प्रचंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचे ग्रॅण्ड फायनल रविवारी अमित हॉटेलमध्ये उत्साही वातावरण झाले.
यामध्ये इयत्ता पहिली ते चौथी गट ‘अ’, मध्ये कृतिका जोगदंडे, गतिक रामचंदानी व सिद्धी कापसे यांनी अनुक्रमे प्रथम, दिव्यती व तृतीय क्रमांक पटाकवला. कबीर नेहलानी, गिरिजा पाटील यांना उत्तजेनार्थ पारितोषिक मिळाले.
इयत्ता पाचवी ते सातवीचा गट ‘ब’ गटात मृदूल घाडे, स्नेहा बुकतारे, हर्ष चौधरी यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला, तर श्रावणी साखरे, साक्षी पारे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. इयत्ता आठवी ते दहावीच्या वर्गात झालेल्या क गटात गायत्री नंदगिरी, इषा शेख, यश मिसार यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला तर निनाद मेटकर, दुर्गा काळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. समूह नृत्य स्पर्धेत अ गटात आॅक्सफर्ड इंग्लिश स्कूलला प्रथम, ऋषी विद्या स्कूलला द्वितीय तर पोदार शाळेला तृतीय पारितोषिक मिळाले. तर ब गटामध्ये आॅक्सफर्ड शाळेला प्रथम, नवयुवक शाळेने द्वितीय व आर्या कोचिंग क्लासेसने तृतीय क्रमांक मिळविला. ऋषी विद्या स्कूलला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. विजेत्यांना विजय बगडिया यांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून मुग्धा धारासूरकर, अंजली पोरजे यांनी काम पाहिले. दीपाली सावजी व रवी जैस्वाल यांनी सूत्रसंचालन केले.
 

Web Title: Junior Jalna's Grand Finale Enthusiasts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.