जालना-पैठण जलवाहिनीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 01:14 AM2019-02-24T01:14:12+5:302019-02-24T01:15:12+5:30

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पैठण ते पाचोड दरम्यान असलेल्या जलवाहिनीला पुन्हा मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.

Jalna-Paithan water leakage leakage | जालना-पैठण जलवाहिनीला गळती

जालना-पैठण जलवाहिनीला गळती

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पैठण ते पाचोड दरम्यान असलेल्या जलवाहिनीला पुन्हा मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पैठण ते पाचोड तसेच पाचोड ते अंबड या मार्गावरील जवळपास पाच ते सात व्हॉल्व्हला मोठ्या प्रमाणावर गळती लागल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. मध्यंतरी जालना पालिकेने पुढाकार घेऊन पैठण ते पाचोड आणि पाचोड ते अंबड या दरम्यानच्या जवळपास १८ शेतकºयांवर पाणी चोरी प्रकरणी गुन्हे दाखल केले होते. तसेच व्हॉल्व्हला गळती लागून नये म्हणून नवीन तंत्रज्ञान वापरून अद्ययावत व्हॉल्व्ह बसविण्यात येणार होते. त्यासाठी जालना पालिकेने विशेष बाब म्हणून दीड कोटी रुपयांची तरतूद केली आहे. असे असताना अद्यापही प्रक्रिया पूर्ण न झाल्याने पाण्याची गळती सुरुच आहे.
दरम्यान, जालना शहराला सध्या जायकवाडी आणि घाणेवाडी जलाशयातून पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या घाणेवाडी तलावात मार्च महिन्यापर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.
त्यामुळे आगामी काळात जालनेकरांना सर्वस्वी जायकवाडीतून येणाºया पाण्यावरच अवलंबून राहावे लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
पाणीचोरी : पथकाची कारवाई
पैठण येथील जायकवाडी धरणातून जालन्याला पाणीपुरवठा करण्यासाठी २५० कोटी रूपये खर्च करून २०१२ मध्ये पाणीपुरवठा योजना सुरू केली होती. या योजनेतूनही जुन्या शहागड योजनेप्रमाणेच पाणीचोरीचे प्रकार सर्रास सुरू असल्याचे पालिकेच्या पाहणी पथकाने काही दिवसांपूर्वीच केलेल्या अचानक तपासणीत धक्कादायक बाबी उघडकीस आली होती.
जायकवाडी धरणातून जालन्यासाठीच्या पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनला भगदाड पाडून तसेच व्हॉल्व्हला छिद्र पाडून त्यातून शेतकरी पाणी चोरी करत होते. या शेतक-यांवर पालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली.

Web Title: Jalna-Paithan water leakage leakage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.