...तरच जालना जिल्हा प्लास्टिकमुक्त होईल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 12:20 AM2017-12-03T00:20:58+5:302017-12-03T00:21:08+5:30

राजेश भिसे। लोकमत न्यूज नेटवर्क विघटन न होणाºया प्लास्टिकमुळे पर्यावरणाला धोका पोहोचण्यासह जनावरांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. ग्लोबल वॉर्मिंग ...

... Jalna district will be free from the district! | ...तरच जालना जिल्हा प्लास्टिकमुक्त होईल!

...तरच जालना जिल्हा प्लास्टिकमुक्त होईल!

googlenewsNext

राजेश भिसे।
लोकमत न्यूज नेटवर्क
विघटन न होणाºया प्लास्टिकमुळे पर्यावरणाला धोका पोहोचण्यासह जनावरांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. ग्लोबल वॉर्मिंग वाढण्यास हा घटकही तेवढाच जबाबदार असून, प्लास्टिकमुक्त महाराष्ट्रचा लढा मंत्रालयापासून सुरू झाला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सकारात्मक पावले उचलली असली, तरी जालना जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. तरच पर्यावरणाचा समतोल राखण्यासह जनावरांचेही आरोग्य अबाधित राहण्यास मदत होईल.
आजकाल सर्वत्र कुठलीही वस्तू वापरण्यासाठी म्हणा वा तिच्या वाहतुकीसाठी सर्रास प्लास्टिकचा वापर केला जात आहे. प्लास्टिक वेस्टमुळे पर्यावरणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. जवळपास पंधरा वर्षांपूर्वीच पर्यावरण तज्ज्ञांनी प्लास्टिक वापराबाबत सावधानतेचा इशारा दिला होता. मात्र, याकडे कुणी गांभीर्याने पाहिले नाही. म्हणूनच ही समस्या आज अतिशय गंभीर बनली आहे. प्लास्टिक कचºयासह ई-कचराही सर्वांसाठीच डोकेदु:खी ठरत आहे. प्लास्टिकच्या अनेक वस्तू मानवी आरोग्याला घातक ठरत आहेत. पण त्याच्या जनजागृतीकडे फारसे कुणाचे लक्ष नसल्याने प्लास्टिकचा वापर हा अव्याहतपणे सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंत्रालयात पाण्याच्या बॉटल्सवर बंदी घातली. प्लास्टिकमुक्त महाराष्ट्रचा हा नारा मंत्रालयापासून सुरु झाला असून, तो संपूर्ण महाराष्ट्रात नेणे गरजेचे आहे. जीवनावश्यक वस्तुच्या पॅकिंगसाठी आज प्लास्टिकचा बिनबोभाटपणे वापर होत आहे. तो मानवी आरोग्यास धोकादायक आहे. पण शासकीय यंत्रणांचे याकडे फारसे लक्ष नसल्याने पर्यावरणासह मानवी जिवन धोक्यात आले आहे.
जालना शहर आणि जिल्ह्याचा विचार करता पर्यावरण प्रदूषण निर्माण करण्यात पाणी बॉटल्स असो वा पाणी पाऊच हे घटक धोकादायक ठरत आहेत. आजघडीला शहरात पाणीपाऊच तयार करणाºया किमान पाच ते सहा कंपन्या आहेत. कुठल्याही हॉटेलमध्ये चहासाठी ग्राहक आला तरी पिण्याच्या पाण्याचे पाऊच समोर ठेवले जाते. ९० टक्के आजारांचे मूळ अशुद्ध पाणी असल्याने नागरिकही धोका पत्करत नाहीत. म्हणूनच पाण्याचा व्यवसाय दिवसेंदिवस कोटींची उड्डाणे घेत आहे. शहरात कुठेही फेरफेटका मारला तर पाण्याचे रिकामे पाऊच रस्त्याच्या कडेला अस्तावस्तपणे पडलेले आढळून येतात. कालांतराने गायी वा इतर जनावरे हे पाऊच खातात आणि अनेक आजारांना आमंत्रण मिळते. मैत्र मांदियाळी यासारख्या स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेत प्लास्टिकमुक्त जालना शहरासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. पण नागरिकांमध्येही पर्यावरण बचावासाठी सकारात्मक भूमिका नसल्याने सध्या तरी याला यश येताना दिसून येत नाही.
जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने पर्यावरणपूरक वस्तू वापरण्याचा संकल्प केला तरच जालना जिल्हा प्लास्टिकमुक्त होऊ शकेल. अन्यथा एक दिवस मानवी आरोग्यही धोक्यात येऊन नवनवीन आजारांना निमंत्रण मिळणार आहे. म्हणूनच सावध ऐका पुढल्या हाका....असे म्हटले तर वावगे ठरु नये.

Web Title: ... Jalna district will be free from the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.