जालना जिल्ह्यात टँकरने गाठला द्विशतकाचा टप्पा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 01:12 AM2019-02-14T01:12:45+5:302019-02-14T01:13:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : जालना जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईने रौद्ररूप धारण केले असून, फेब्रुवारीच्या मध्यातच जिल्ह्यात टँकरने व्दितशतक ...

Jalna district has reached double ton by water tanker ... | जालना जिल्ह्यात टँकरने गाठला द्विशतकाचा टप्पा...

जालना जिल्ह्यात टँकरने गाठला द्विशतकाचा टप्पा...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईने रौद्ररूप धारण केले असून, फेब्रुवारीच्या मध्यातच जिल्ह्यात टँकरने व्दितशतक गाठले आहे. यंदा पाणी टंचाईची गंंभीर स्थिती लक्षात घेता प्रशासनाने टंचाई निवारण्यासाठी ३८ कोटी रूपयांचा आराखडता तयार केला असून, आता पर्यंत जवळपास ११ कोटी रूपये खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
जालना जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने मोठी दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. पिकांसह यंदा पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होणार ही शक्यता आता वास्तवात उरतले आहे. सध्या जालना शहरासह जिल्ह्यात पाणी टंचाई आतापासून जाणवत आहे.
एकीकडे या टंचाईवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्या सारखा पैसा लागणार आहे, ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने भूजल सर्वेक्षणाच्या अहवालानंतर कोट्यवधी रूपयांची तरतूद असणारा आराखडा तयार केला होता. मात्र, नंतर त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी परत पाठवून तो केवळ ३८ कोटी रूपयांवर आणला. आता या मंजुर आराखड्यातून सध्या टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत असतांनाच जुन्या नळयोजनांची दुरूस्ती, नवीन नळ योजनांना मान्यता मिळवून त्या पूर्ण करणे, विहीर अधिग्रहण करण्यात येत आहे.
या उपाय योजना आखूनही ही टंचाई दूर होईल असे चिन्ह नसून, टँकरव्दारे पाणीपुरवठा हा तात्पुरता उपाय असल्याचे सांगण्यात आले. कायमस्वरूपी पाणी योजनेसाठी जलयुक्त शिवार ही योजना मोठ्या प्रमाणावर राबवली जात असून, त्यातही यंदा कमी पाऊस झाल्याने पाणीसाठा पुरेसा साठला नाही. त्यामुळे ही योजनाही येथे अयशस्वी ठरली आहे.
एकूणच सध्या ज्या गावांकडून टँकरचे प्रस्ताव येतात, त्यांची तातडीने छाननी करण्यात येत आहे. आता टँकर मंजुरीचे अधिकार हे उपविभागीय अधिका-यांना दिले आहेत.
हातपंपाची दुरुस्ती गरजेची
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हातपंप घेण्यात आले आहेत. असे असताना ते हातपंप देखभाल दुरूस्तीअभावी बंद पडले आहेत. ते हातपंप दुरूस्त करून त्यात आणखी जादा लोखंडी पाइप टाकल्यास त्यातून हमखास पाणी मिळू शकेल. तसेच या हातपंपावर विद्युत मोटार बसवूनही त्यातून पाणी काढता येऊ शकते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
प्लास्टिक टाक्या कागदावर
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सरकारकडून प्लास्टिकच्या टाक्या गावाना देण्यात येण्याची घोषणा केली होती. मात्र अद्यापही कुठल्याच गावांना या टाक्या मिळाल्या नसल्याचे सांगण्यात आले. ही प्लास्टिकची टाकी सार्वजनिक जागेवर ठेवून, त्यात टँकरचे पाणी ओतून त्याला तोटीव्दारे गावक-यांना देण्याची ही योजना आहे.

Web Title: Jalna district has reached double ton by water tanker ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.