मतदान केंद्राची पोलीस अधीक्षकांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 12:54 AM2019-04-14T00:54:18+5:302019-04-14T00:54:58+5:30

अंबड तालुक्यातील महाकाळा येथील संवेदनशील मतदान केंद्राला पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी भेट दिली.

Inspection by the Superintendent of polling station | मतदान केंद्राची पोलीस अधीक्षकांकडून पाहणी

मतदान केंद्राची पोलीस अधीक्षकांकडून पाहणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अंकुशनगर : अंबड तालुक्यातील महाकाळा येथील संवेदनशील मतदान केंद्राला पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी भेट दिली.
परभणी मतदार संघात १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघात घनसावंगी तालुक्यातील १८३, अंबड तालुक्यातील ९७ तर जालना तालुक्यातील ५९ मतदान केंदे्र येतात. दरम्यान, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी नुकतीच अंबड तालुक्यातील महाकाळा येथील मतदान केंद्राची पाहणी केली. याप्रसंगी पोलीस अधीक्षकांनी अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. याप्रसंगी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, सी. डी. शेवगण, पोलीस निरीक्षक शिवानंद देवकर, सपोउनि. हनुमंत वारे आदींची उपस्थिती होती. तीर्थपुरी येथेही त्यांनी पाहणी केल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Inspection by the Superintendent of polling station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.