योजनांची गतीने अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 01:20 AM2018-05-22T01:20:30+5:302018-05-22T01:20:30+5:30

मराठवाडा पॅकेज अंतर्गत गाय, म्हैस व शेळ्या वाटपाचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत असून, या प्रकल्पातंर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्सायासाठी संबंधीत यंत्रणांनी गतीने काम करण्याचे निर्देश पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिले.

 Immediately implement the schemes- Khotkar | योजनांची गतीने अंमलबजावणी करा

योजनांची गतीने अंमलबजावणी करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात मराठवाडा पॅकेज अंतर्गत गाय, म्हैस व शेळ्या वाटपाचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत असून, या प्रकल्पातंर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्सायासाठी संबंधीत यंत्रणांनी गतीने काम करण्याचे निर्देश पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये सोमवारी दुधाळ जनावरे वाटप प्रकल्पाच्या आढावा बेठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळभ खोतकर यांनी वरील निर्देश दिले. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी पी.बी.खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, प्रकल्प संचालक सुरेश बेदमुथा, ेमुख्यधिकारी संतोष खांडेकर, शिवसेना जिल्हा प्रमख भास्कर अंबेकर, पंचायत समितीचे सभापती पांडुरंग डोंगरे, बाजार समितीचे संचालक प्रल्हाद मोरे, वंसत जगताप, विष्णू पाचफुले तसेच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी आणि बँकांचे शाखा प्रमुख, विमा कंपनीचे व्यवस्थापक आदीची उपस्थिती होती.
खोतकर म्हणाले की, शेतकऱ्यांना शेती बरोबरच जोडधंदा म्हणून दूध विक्रीचा व्यवसाय करता यावा यासाठी दुधाळ जनावरे वाटपाचा पथदर्शी प्रकल्प जालना जिल्ह्यात प्रथमच राबविण्यात येत आहे. तसेच या योजनेतंर्गत लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी आवश्यक असलेले अर्ज तातडीने भरुन घेण्यात यावेत. या लाभार्थ्यांना द्यावयाच्या अनुदानासाठी बँकांनी लाभार्थ्यांना सहतोपरी सहकार्य करावे. लाभार्थ्यांना उच्च प्रतिचे जनावरे देण्यासाठी राज्यात उपलब्ध असतील तर खरेदी करण्यात यावे, अथवा परराज्यातून दर्जेदार अशा जनावरांची खरेदी करण्यात यावी असे खोतकरांनी सांगितले. या बैठकीत उपस्थित अधिकारी, कर्मचा-यांना समाधानकारक उत्तरे देता न आल्याने खोतकर जाम चिडले होते. त्यांनी हलगर्जी करणाºया अधिका-यांना कडक शब्दात सुनावले. काही माहिती विचारली असता ती देखील समाधानकारक देता न आल्याने पुढील बैठकीत सर्व आवश्यक ती माहिती सोबत ठेवण्याच्या सूचना दिल्या.
जालना : प्रकल्प यशस्वी केल्यास राज्यभर राबवणार
जनावराचा विमा शंभर टक्के काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगत जालना जिल्ह््यामध्ये हा प्रकल्प यशस्वी झाल्यास संपूर्ण राज्यात याच धर्तीवर प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचेही राज्यमंत्री खोतकर यांनी सांगितले. पशुपालकांकडे असलेल्या जनावरांना वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या अधिका-यांनी त्यांना ठरवून दिलेल्या मुख्यालयाच्या ठिकाणी थांबून योग्य ती सेवा देण्याचे निर्देशही खोतकर यांनी यावेळी दिले. गेल्या काही दिवसांमध्ये अंबड, गोलापांगरी येथे उपचारा अभावी जनावरांचा तडफडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

Web Title:  Immediately implement the schemes- Khotkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.