युती कायम राहण्यासाठी मोदी व उध्दवांशी बोलू- रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:58 AM2018-06-13T00:58:23+5:302018-06-13T00:58:23+5:30

आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजप सोबत राहावे म्हणून आपण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले आहे. त्यांनी देखील याबाबत सकारत्मकता दाखवून आपण स्वत: शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्याशी संपर्क करणार असल्याची माहिती माझ्याजवळ दिली आहे. युती करणे शिवसेनेच्या अस्तित्वासाठी देखील महत्वाचे असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

I will talk to Modi and Uddhav Thackeray - Ramdas Athavale | युती कायम राहण्यासाठी मोदी व उध्दवांशी बोलू- रामदास आठवले

युती कायम राहण्यासाठी मोदी व उध्दवांशी बोलू- रामदास आठवले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजप सोबत राहावे म्हणून आपण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले आहे. त्यांनी देखील याबाबत सकारत्मकता दाखवून आपण स्वत: शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्याशी संपर्क करणार असल्याची माहिती माझ्याजवळ दिली आहे. युती करणे शिवसेनेच्या अस्तित्वासाठी देखील महत्वाचे असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. ते मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलत होते.
रामदास आठवले हे त्यांच्या मित्राच्या निधनानंतर त्यांच्या कुंटुंबाच्या सांत्वनासाठी जालना दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. नक्षलवाद्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिवे मारण्याची धमकी आल्यावरून विरोधी पक्ष जे राजकाण करत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. भीमा-कोरगाव दंगल प्रकरणातील भिडे गुरूजींच्या सहभागाबद्दल आपण मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगून, भिडे गुरूजींनी नाशिक येथे जे वक्तव्य केले आहे, ते अंधश्रध्दा पसरवणारे असून, त्यांच्या सभांना परवानगी नाकारली पाहिजे अशी मागणी आठवले यांनी केली.
युपीएससी न देता प्रशासनात आयएएस दर्जाचे अधिकारी करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल विचारले असता, यावर उत्तर देण्याचे टाळले. यावेळी त्यांनी सामाजिक न्याय विभागातील अधिका-यांशी चर्चा केली. पत्रकार परिषदेस अ‍ॅड. ब्रह्मानंद चव्हाण, गणेश रत्नपारखे, बबनराव रत्नपारखे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: I will talk to Modi and Uddhav Thackeray - Ramdas Athavale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.