हायवाची कारला धडक, दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:38 AM2019-01-10T00:38:33+5:302019-01-10T00:39:11+5:30

वाळूने भरलेल्या हायवाने मारोती गाडीला जोराची धडक दिल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास औरंगाबाद सोलापूर मार्गावर घडली.

Highway hit the car, two serious | हायवाची कारला धडक, दोन गंभीर

हायवाची कारला धडक, दोन गंभीर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अंकुशनगर : वाळूने भरलेल्या हायवाने मारोती गाडीला जोराची धडक दिल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास औरंगाबाद सोलापूर मार्गावर घडली. यात कारच्या चालकासह दोघेजण गंभीर जखमी झाले.
अंकुशनगर येथील गोदावरी पात्रातून वाळू भरुन औरंगाबाद कडे निघालेल्या विनाक्रमाक हायवाने बिडकडे जाणारी वॅगनर कार क्रमांक एम.एच. ०२ ए. एन. ८११७ या गाडीला समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या गेटसमोर जोराची धडक दिली. यात बलभीम अण्णा वाघमारे (४६) संगीता बलभीम वाघमारे (४०) , महेश रमेश मोरे चालक (२५, सर्व राहणार हनुमाननगर, बीड) या घटनेत जखमी झाले. जोराच्या धडकेमुळे परिसरात मोठा आवाज झाला. धडक झाल्याने समजताच अंकुशनगर पोलीस चौकीच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने कारखान्याच्या खाजगी डॉक्टरकडे उपचारासाठी दाखल करण्यात आले. या मार्गावर हायवामुळे अपघात वाढले आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी हायवाच्या काचा फोडून आपला रोष व्यक्त केला.
चालकाने पळ काढला
औरंगाबाद, सोलापूर महामार्गावर अपघात होतात. परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. यामुळे चालकाने हायवा सोडून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळावरून वॅगनर कार, आणि हायवा ताब्यात घेतला. विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांच्या पथकाने काल परिसरात वाळूच्या साठ्याची पाहणी केली होती, मात्र दुसऱ्याच दिवशी वाळूची वाहतूक सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Highway hit the car, two serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.