रेनकोट विसरला म्हणून शाळा दिली सोडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:24 PM2019-07-12T12:24:52+5:302019-07-12T12:28:20+5:30

मुख्याध्यापकाचा मनमानी कारभार

Headmaster gives Holiday to the school as forgotten the Raincoat at home | रेनकोट विसरला म्हणून शाळा दिली सोडून

रेनकोट विसरला म्हणून शाळा दिली सोडून

Next
ठळक मुद्देचार वाजता सुटणारी शाळा साडेतीन वाजताच सोडून दिली.मुळे पालकांनी संताप व्यक्त केला.

तळणी (जि. जालना) :  रेनकोट सोबत नसल्याने आपण पावसात भिजू या भीतीपोटी मंठा तालुक्यातील कोकरंबा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने साडेतीन वाजताच शाळेला कुलूप लावून विद्यार्थ्यांना सोडून दिल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला.  या प्रकारामुळे पालकांनी संताप व्यक्त केला.

कोकरंबा येथे इयत्ता १ ते ५ वी पर्यंत वर्ग असून, ४१ विद्यार्थी आहेत. मुख्याध्यापक एन.व्ही. आघाव यांच्यासह दोन शिक्षकाची शाळेत नियुक्ती आहे.  मुख्याध्यापक एन. व्ही आघाव हे बुलडाणा जिल्ह्यातील लोणार येथून अपडाऊन करतात. रजा न टाकताच शाळेत गैरहजर राहणे, शाळेच्या वेळेत न येणे इ. तक्रारींमुळे मुख्याध्यापकासह शिक्षक  नेहमीच चर्चेत असतात.  गुरूवारी दोन्ही शिक्षक तळणी येथे प्रशिक्षणासाठी गेले होते. यामुळे मुख्याध्यापक आघाव हे एकटेच शाळेत होते. 

साडेतीन वाजेच्या सुमारास आभाळ दाटून आले आणि रिमझिम पाऊसही सुरु झाला. त्यामुळे लोणार येथे जाण्यास अडचण येईल. त्यातच रेनकोटही घरीच राहिल्याने मुख्याध्यापक आघाव यांनी चार वाजता सुटणारी शाळा साडेतीन वाजताच सोडून दिली. यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला.

कारवाई करणार
यापूर्वी सुद्धा मुख्याध्यापक एन. व्ही. आघाव हे रजा न टाकताच वैद्यकीय रजेवर गेले होते. याबाबत त्यांना नोटीस पाठविली होती. त्याचा खुलासा अद्यापही आलेला नाही. विद्यार्थ्यांना अर्धा तास आधीच शाळेतून सोडून देणे ही गंभीर बाब आहे. याची चौकशी करून योग्य कारवाई करण्यात येईल असे  केंद्रप्रमुख एस. यू. वाघ यांनी सांगितले.

 माझा रेनकोट घरी राहिल्याने पावसात घरी जाण्यास अडचण आली असती यामुळे विद्यार्थ्यांना सोडून दिले.
- एन.व्ही. आघाव, मुख्याध्यापक 

Web Title: Headmaster gives Holiday to the school as forgotten the Raincoat at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.