अपंगांना मिळणार कृत्रिम हात-पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 12:39 AM2019-07-03T00:39:15+5:302019-07-03T00:39:50+5:30

अपंगांचे दु:ख आपण केवळ वाटून घेऊ शकतो. त्यामुळे त्यांना हवी ती मदत देण्यासाठी समाजाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.

Handcuffs for disabled people | अपंगांना मिळणार कृत्रिम हात-पाय

अपंगांना मिळणार कृत्रिम हात-पाय

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अपंगांचे दु:ख आपण केवळ वाटून घेऊ शकतो. त्यामुळे त्यांना हवी ती मदत देण्यासाठी समाजाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.
ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तथा लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी कृत्रिम हात पाय बसविण्याच्या उपक्रमाचे विशेष शिबीर घेण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. कैलास गोरंट्याल, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, साधू वासवानी मिशनचे मिलींद जाधव, सुशील ढगे, आयएमएच्या अध्यक्षा कल्पना भन्साली, आर्थोपेडिक असो.चे अध्यक्ष डॉ. रितेश अग्रवाल, सचिव डॉ. राजीव डोईफोडे, प्रकल्प संचालक कैलास सचदेव, लॉयन्स क्लबचे अध्यक्ष राजेश भुतिया, डॉ. रामनारायण जैस्वाल, डॉ. उमेश करवा, लोकमत समाचारचे कार्यकारी संपादक अमिताभ श्रीवास्तव, शाखा व्यवस्थापक मकरंद शहापूरकर, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी रमेश बागडी, इम्रान सिद्दीकी, संदीप पौनारकर, मनोज बसैये आदींची उपस्थिती होती. यावेळी नगर पालिकेच्या वतीने आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन गोरंट्याल यांनी दिले. एस.चैतन्य यांनीही विचार व्यक्त केले. आजच्या शिबिरात १५८ अपंगांच्या हात आणि पायाचे मोजमाप करण्यात आले. लवकरच त्यांना कृत्रिम अवयव मिळतील.

Web Title: Handcuffs for disabled people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.