जिल्ह्यात शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रवेशाला लागले यंदा ग्रहण...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 01:07 AM2018-07-19T01:07:35+5:302018-07-19T01:08:15+5:30

शासकीय तंत्र निकेतनमध्ये प्रवेश मिळावा म्हणून पूर्वी मोठी स्पर्धा होती. मात्र यंदा ही स्पर्धा नसल्याचे चित्र दिसून येत आहे. यंदा प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी १६ जुलै ही अंतिम तारीख असताना ती वाढवून देऊन २० जुलै करण्यात आली. असे असतानाच यंदा जालना आणि अंबड येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश क्षमतेएवढेही विद्यार्थी येतात की, नाही अशीच चिन्ह आहेत.

Government Polytechnic admissions in truoble | जिल्ह्यात शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रवेशाला लागले यंदा ग्रहण...!

जिल्ह्यात शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रवेशाला लागले यंदा ग्रहण...!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शासकीय तंत्र निकेतनमध्ये प्रवेश मिळावा म्हणून पूर्वी मोठी स्पर्धा होती. मात्र यंदा ही स्पर्धा नसल्याचे चित्र दिसून येत आहे. यंदा प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी १६ जुलै ही अंतिम तारीख असताना ती वाढवून देऊन २० जुलै करण्यात आली. असे असतानाच यंदा जालना आणि अंबड येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश क्षमतेएवढेही विद्यार्थी येतात की, नाही अशीच चिन्ह आहेत.
तंत्रनिकेतनच्या तीन वर्षाच्या डिप्लोमा केलेल्यांना उद्योगांकडून मोठी मागणी असते. ही मागणी लक्षात घेऊन जालना जिल्ह्यात दोन शासकीय आणि दोन खासगी तंत्रनिकेतन महाविद्यलये आहेत. यंदा शासकीय महाविद्यालयातील प्रवेशाची स्थिती एवढी बिकट असल्याने खाजगी विद्यालयांचा विचार न केलेलाच बरा.
जालना आणि अंबड येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सिव्हील, इलेक्ट्रॉनिक्स, इलेट्रीकल, मॅकेनिकल, आयटी, काँप्युटर इंजिनिअर आणि तसेच केमिकल असे डिप्लोमा आहेत. त्यात दोन्ही महाविद्यालयात ४८० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. प्रथमवर्ग प्रवेशासाठी यंदा १६ जुलै ही अंतिम तारीख होती, ती यंदा वाढवून २० जुलै करण्यात आली. ही अंतिम तारीख संपण्यासही एकच दिवस शिल्लक आहे. असे असताना जालना येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये २८० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून, अंबड येथे हीच नोंदणी केवळ ११० एवढी कमी झाली आहे. यंदा विद्यार्थ्यांचा ओढा नेमका कशामुळे घटला हा संशोधनाचा विषय असून, यामुळे उच्च व तंत्रशिक्षण पातळीवरही चिंतन सुरू असल्याचे बोलले जात आहे. यंदा राखीव विद्यार्थ्यांना प्रवेश देताना त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र सोबत जोडणे बंधनकारक केले होते. मात्र, नंतर ही अट शिथिल करण्यात आल्याने तरी प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Government Polytechnic admissions in truoble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.