चार हजार शेतकरी बोंडअळीच्या अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 01:07 AM2018-07-11T01:07:28+5:302018-07-11T01:08:03+5:30

बदनापूर तालुक्यात कपाशीवरील बोंडअळीमुळे पिकांच्या नुकसानीपोटी वितरित केलेल्या अनुदानापासुन ३ हजार ९४६ बाधितग्रस्त शेतकरी वंचित राहिले असून त्यांचे अनुदान बँकेत जमा झालेले नाही

Four thousand farmers are deprived of subsidy from Bondal | चार हजार शेतकरी बोंडअळीच्या अनुदानापासून वंचित

चार हजार शेतकरी बोंडअळीच्या अनुदानापासून वंचित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : तालुक्यात कपाशीवरील बोंडअळीमुळे पिकांच्या नुकसानीपोटी वितरित केलेल्या अनुदानापासुन ३ हजार ९४६ बाधितग्रस्त शेतकरी वंचित राहिले असून त्यांचे अनुदान बँकेत जमा झालेले नाही
तालुक्यात खरीप हंगाम २०१७ मध्ये बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी बाधितग्रस्त शेतक-यांना राज्य शासनाने आर्थिक मदत देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला परंतु झारीतील शुक्राचार्यांमुळे हे अनुदान अनेक शेतक-यां पर्यंत अद्याप पोहोचलेले नाही़ तालुक्यात बोंडअळीच्या नुकसानीपोटी एकुण ६ कोटी ५४ लाख ३३ हजार २९६ रूपये अनुदान तालुका प्रशासनाला प्राप्त झाले होते यापैकी तालुक्यातील ३५ गावामधील १७०९५ शेतक-यांच्या एकूण ९४८७ हेक्टर बाधीत क्षेत्राला एकूण ६ कोटी ४९ लाख ५९ हजार ३६५ रूपये बाधित शेतक-यांच्या विविध बँकांमधील शाखांमधे जमा करण्यात आले यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावांमधील शेतक-यांचे बँक खाते क्रमांक घेण्याबाबत संबंधित तलाठी व कृषि सहायकांना सूचना करण्यात आल्या होत्या परंतु उंटावरून शेळ्या राखण्याची सवय असणा-या काही कर्मचा-यांकडून अनेक गावांमधील अनेक शेतक-यांचे बँक खाते क्रमांक घेतले गेले नाहीत. परिणामी तहसील कार्यालयात जमा केलेल्या गावनिहाय शेतक-यांच्या याद्यांमध्ये अनेक शेतक-यांचे बँक खाते क्रमांक देण्यात आलेले नाही़ त्यामुळे बोंडअळीमुळे बाधित असलेल्या शेतक-यांना अनुदान असतानाही आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागले़
तालुक्यात हिवरा येथे १७१ शेतकरी, हिवरा दाभाडी ३६ शेतकरी, हालदोला १४१ शेतकरी, सोमठाणा ३८० शेतकरी, सिंधी पिंपळगाव ६ शेतकरी, सायगाव २५३ शेतकरी सागरवाडी ४६,शेलगाव १४४, सिरसगाव १०३, विल्हाडी ११३, वाघ्रूळ दाभाडी १८९ वाघ्रुळ डोंगरगाव २७७, वाकुळणी ९१,वंजारवाडी ९४, रोषणगाव २९५, राळा १०, राजेवाडी २६०, राजणगाव ३४, मेव्हणा २३, माळेगाव १७१,मालेवाडी २२, मानदेवळगाव ११३, मात्रेवाडी ३, मांडवा १७०, मांजरगाव २९४, भाकरवाडी ७, बुटेगाव ५१, पानखेडा ४४, नानेगाव १८८, वाल्हा ३४, रामखेडा १६, म्हसला ९०, भातखेडा ५५ पाडळी १४ इ. गावांमधील एकूण ३९४६ शेतक-यांचे अनुदान बँकेत गेलेले नाही त्यामुळे या शेतक-यांना आता शासनाकडून अनुदान आल्यानंतर बोंडअळीचे अनुदान मिळणार आहे़ पहिल्या टप्प्यात पाठविलेल्या बोंडअळीच्या अनुदानात तालुक्यातील केवळ वरूडी या गावातील पूर्ण शेतक-यांचे बँक खाते क्रमांक दिलेले आहेत तसेच यावेळी प्रथमच प्रशासनाकडून प्रत्येक बँकांच्या शाखानिहाय सुमारे साडेतीनशे ते चारशे धनादेश बनवून संबंधित शाखांमध्ये जमा केले त्यामुळे विविध शाखांमध्ये तातडीने निधी जमा झाला. शासनाकडून उर्वरित गावांना बोंडअळी अनुदानाची रक्कम मिळेना
तालुक्यातील अद्यापही ५७ गावांमधील शेतक-यांना बोंडअळीचे अनुदान मिळाले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Web Title: Four thousand farmers are deprived of subsidy from Bondal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.