अपघातात चार जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:17 AM2019-02-25T00:17:29+5:302019-02-25T00:17:40+5:30

भोकरदन - हसनाबाद या मार्गावरील कुंभारी गावाजवळ कारने दुचाकीला धडक दिल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या अपघातात चार जण जखमी झाले असून, यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.

Four people injured in the accident | अपघातात चार जण जखमी

अपघातात चार जण जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : भोकरदन - हसनाबाद या मार्गावरील कुंभारी गावाजवळ कारने दुचाकीला धडक दिल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या अपघातात चार जण जखमी झाले असून, यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.
कोंडीराम भीमराव ठाले (२७), अरुण अण्णा सोनवणे (२५) (दोघेही रा. वाडी बुद्रक ता. भोकरदन) हे दोघे गंभीर जखमी झाले असून, विजय सोनुने, कैलास सोनूने (रा. मातला, जि. बुलढाणा) हे किरकोळ जखमी झाले आहेत.
हसनाबादहुन भोकरदनकडे जाणाऱ्या कार (क्र. एम.एच. १९, क्यु. ८८३७) ने भोकरदनहुन हसनाबादकडे जाणाºया दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील कोंडीराम ठाले, अरुण सोनवणे हे दोघेही गंभीर जखमी झाले. तर कारमधील विजय सोनुने, कैलास सोनुने हे किरकोळ जखमी झाले आहे. कारने धडक दिल्याने दुचाकी दुरवर जाऊन फेकल्या गेली. त्यानंतर दुचाकीने अचानक पेट घेतला. माहिती मिळताच पोउपनि. साखळे, कर्मचारी एस. एन. केंद्रे यांनी घटनास्थळी धाव घेतले.

Web Title: Four people injured in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.