कार अपघातात पाच कर्मचारी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 12:48 AM2019-05-07T00:48:54+5:302019-05-07T00:49:20+5:30

जालन्याहून जाफराबाद येथील न्यायालयात कारने जाणारे पाच कर्मचारी सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात जखमी झाले.

Five employees injured in car accident | कार अपघातात पाच कर्मचारी जखमी

कार अपघातात पाच कर्मचारी जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालन्याहून जाफराबाद येथील न्यायालयातकारने जाणारे पाच कर्मचारी सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात जखमी झाले. त्यातील दुर्गेश मुळे यांच्या गळ्याला कारचे स्टिअरिंग लागल्याने ते गंभीर जखमी झाले असून, ते एका खासगी रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. तर अन्य चार कर्मचारी हे शहरातील वेगवेगळ्या रूग्णालयात उपचार घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास हे कर्मचारी एका कारने जाफराबाद येथील न्यायालयात जात असताना, जालना तालुक्यातील घाणेवाडी जवळील एका वळण रस्त्यावर ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून जालन्याकडे येणाऱ्या एसटीबसला कारची धडक बसली. या धडकेत कार चालवत असलेले मुळे यांच्या गळ्याला स्टिअरिंगचा जबर मार लागून ते रक्तबंबाळ झाले.
याचवेळी या मार्गावरून अ‍ॅड. जनार्दन मदन जात होते, त्यांनी लगेचच जखमी कर्मचाऱ्यांची मदत करून त्यांना रूग्णवाहिका बोलावून जालन्याला हलवले.
यावेळी परिसरातील ग्रामस्थांनीही मदत केली. या अपघातात ए.एम. पंडित, राजेश वाघमारे, अशोक बावणे, बाबू राठोड आणि दुर्गेश मुळे यांचा जखमींमध्ये समावेश आहे. या अपघाताची माहिती मिळाल्यावर महामार्ग पोलीस तसेच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते.

Web Title: Five employees injured in car accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.