जालन्यात दुकानाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:14 AM2018-09-20T00:14:38+5:302018-09-20T00:14:54+5:30

मोतीबाग जवळील एका दुकानाला बुधवारी सकाळी आग लागली. यात दुकानातील साहित्य जळून खाक झाले

Fire occures in the shop in Jalana | जालन्यात दुकानाला आग

जालन्यात दुकानाला आग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील मोतीबाग जवळील एका दुकानाला बुधवारी सकाळी आग लागली. यात दुकानातील साहित्य जळून खाक झाले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग शॉट सर्किटने लागली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शहरातील मोतीबाग जवळ असलेल्या सक्सेस कार डेकोर अँड टायर या दुकानातून धूर निघत असल्याने येथील बाजूच्या दुकानदारांनी दुकान चालकाला याची माहिती दिली. त्यानंतर दुकान उघडून पाहिले असता, दुकानातील साहित्य जळून खाक झाले होते. घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आगेवर नियंत्रण आण्यात आले. दरम्यान, या आगेत लाखोे रुपयांचे नुकसान झाले असून, ही आग शॉट सर्कीटने लागली असल्याची माहिती पोलीसांनी दिली.
ही आग आटोक्यात आण्यासाठी अग्निशमन दलाचे अशोक वाघमारे, अब्दुल बासेर, रवी बनसोडे, सागर गडकरी, विठ्ठल कांबळे यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, ही आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच त्यानी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तत्पूर्वी आग विझविण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी मदत केली. या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Fire occures in the shop in Jalana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.