कालबाह्य बसेसमधून जीवघेणा प्रवास...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:42 AM2019-05-27T00:42:31+5:302019-05-27T00:43:11+5:30

अंबड आगारात असलेल्या बहुतांश बस कालबाह्य झाल्या आहे. या मोडक्या -तोडक्या बसमधून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.

Fatal travels from outdated buses ...! | कालबाह्य बसेसमधून जीवघेणा प्रवास...!

कालबाह्य बसेसमधून जीवघेणा प्रवास...!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
घनसावंगी : अंबड आगारात असलेल्या बहुतांश बस कालबाह्य झाल्या आहे. या मोडक्या -तोडक्या बसमधून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. यामुळे मोठा अपघात होण्याची भीती प्रवाशांनी व्यक्त केली आहे. नवीन बसची मागणी करूनही याकडे गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने प्रवाशात संताप आहे.
अंबड आणि घनसावंगीसाठी संयुक्त असणाऱ्या अंबड आगारात प्रवाशांच्या सेवेसाठी ६५ बसेस आहेत. त्यात मानव विकास मिशनच्या १४ बसगाड्या आहेत. गाड्याच देखभाल दुरुस्तीसाठी दुरुस्तीसाठी आगारात १० मेकॅनिक आहेत. तर वाहक व चालक मिळून २५० कर्मचारी सेवा देत आहे. या आगारातून पुणे, अकोला, धुळे, नाशिक आदी ठिकाणी जलदगतीच्या बस मुक्कामी जातात. मात्र अनेक वेळा या बस रस्त्यातच अनेक वेळा नादुस्त होत असल्याचे चालक वाहक सांगतात. याचा नाहक त्रास प्रवाशांना सोसावा लागतो. तसेच चालक वाहकांचे हाल होते. दिवसेंदिवस तिकीट दर वाढत आहे. किलोमीटरला जवळपास दीड रुपया भाडे आकारले जात आहे. असे असतांना प्रवाशांना सुविधा देण्यास अंबड आगार कमी पडत आहे. बहुतांश बस मोडकडीस आलेल्या आहेत. यामध्ये मानव विकास मिशनच्या बसचा समावेश आहे. यामुळे विद्यार्थीनींना धोकादायक प्रवास करावा लागतो. आगारातील बस अस्वच्छ, मोडकळीस आलेल्या ,साईड ग्लास, व खिडक्यांना दोरीने बांधून ठेवून कसातरी आधार दिला आहे. यामुळे अपघात होण्याची नेहमीची भिती असते. याबाबत पालक, नागरिकांनी आगार प्रमुखाकडे निेवेदन देऊन याकडे लक्ष देण्याची मागणी केली मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
सर्व बस मोडकळीस आलेल्या आहेत. यामध्ये पंधरा लांबपल्याच्या बसचा समावेश आहे. एटी महामंडळाच्या बसमधून प्रवाशांनी प्रवास करावा यासाठी महामंडळाकडून विविध उपाययोजना करण्यात येतात. मात्र आगारात बसची अवस्था बघून प्रवाशी खाजगी वाहनकाकडे वळत आहेत.
विभागीय नियंत्रकाकडून अंबड आगाराकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
गेल्या अनेक वर्षापासून नवीस बस देण्याची मागणी करण्यात आली मात्र याकडे कायम दुर्लक्ष करण्यात येत आहे. अंबड आणि घनसावंगी हे जिल्ह्यातील महत्वाचे तालुका आहेत.
या तालुक्याना महत्वाचे गावे जोडलेली आहेत. मात्र प्रवाशांना मोडक्या- तोडक्या बसमधून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. खटाºया बसमध्ये बसल्यानंतर होणारा आवाज यामुळे ट्रॅक्टरमधून प्रवास करत आहे की काय, असा अनूभव प्रवाशी व्यक्त करतात. असे असतांना ग्रामीण भागातील नागरिकांना नाईलाजाने धोकादायक प्रवास करावा लागत आहे.
तापमान ४० अंशापर्यत जात आहे. बसला खिडक्या नसल्याने उन्ह आणि गरम वाºयामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
अंबड आगाराकडून विभागीय नियंत्रकाकडे नवीन गाड्याचा प्रस्ताव पाठविल्याची माहिती आहे.

Web Title: Fatal travels from outdated buses ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.