शेतक-यांनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे - रामदेव बाबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 01:10 AM2018-02-26T01:10:20+5:302018-02-26T01:10:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भोकरदन : शेतक-यांनी सेंद्रिय शेती करून विषमुक्त अन्नधान्याचे उत्पादन घ्यावे, असे आवाहन योग गुरु रामदेव बाबा ...

Farmers should give priority to organic farming - Ramdev Baba | शेतक-यांनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे - रामदेव बाबा

शेतक-यांनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे - रामदेव बाबा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : शेतक-यांनी सेंद्रिय शेती करून विषमुक्त अन्नधान्याचे उत्पादन घ्यावे, असे आवाहन योग गुरु रामदेव बाबा यांनी केले. भोकरदन येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा़रावसाहेब दानवे व पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भोकरदन शहरात कृषी उत्पन्न बजार समितीच्या प्रांगणात शनिवारी हा मेळावा घेण्यात आला. या वेळी खा़ रावसाहेब दानवे, आ़ संतोष दानवे, आ़ नारायण कुंचे, निर्मला दानवे, डॉ. जयदीप आर्य, राधेश्याम गोयल, प्रा़ राजेश सरकटे, बाजार समितीचे उपसभापती भास्करराव दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
रामदेव बाबा म्हणाले, की कृषी प्रधान भारताला जगात अत्यंत महत्त्व आहे. शेतकरी सुखी समृध्दी झाला तरच खºया अर्थाने देशाची प्रगती होणार आहे. त्यामुळे शेतक-यांनी सेंद्रिय शेती करावी. दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी गायीचे पालन करावे. वनशेती केल्यास कोरफड, गुळवेल अशा असंख्य वनस्पतीची आम्ही खेरदी करू. वनशेतीतून एकरी २ ते ५ लाखांपर्यंत उत्पादन होऊ शकते. पतंजलीच्या माध्यमातून आतापर्यंत एक कोटी शेतकरी जोडले आहेत. येणा-या काळात पाच कोटी शेतकरी जोडण्याचा संकल्प केला आहे. शेतकºयांचा उत्पादित मालावर प्रक्रिया करून चांगला मोबदला देण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले. शरीर स्वास्थ्य व मन:शांतीसाठी प्रत्येकाने योग साधना करण्याचे आवाहन त्यांनी केले. खा़ दानवे म्हणाले की मराठवाड्यात मका, सोयाबीन, मोंसबीचे उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणात घेतात. त्यावर पतंजलीने प्रक्रिया उद्योग काढण्याची विनंती त्यांनी केली. आ. दानवे यांनी भोकरदन-जाफराबाद मतदार संघातील बचत गटांचे उत्पादने पतंजलीच्या माध्यमातून खरेदी केली तर या भागात रोजगार वाढण्यास मदत होईल, असे सांगितले. मेळाव्याला माजी जि.प. अध्यक्ष तुकाराम जाधव, राजेंद्र देशमुख, विजसिंह परिहार, शालिकराम म्हस्के, आशा पांडे, आशा माळी, संजना जाधव, महेश आकात, मुकेश पांडे, शोभा मतकर, उषा आकात, संजय सरकटे, डॉ चंद्रकांत साबळे आदींची उपस्थिती होती.
जिल्ह्यात मोसंबी या फळ पिकावर पतंजली या उद्योग समुहाच्यावतीने लवकरच प्रक्रिया उद्योग सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा योगगुरु स्वामी रामदेव बाबा यांनी भोकरदन येथील शतकरी मेळाव्यात बोलतांना दिली. विशेष म्हणजे अंबडचे माजी आमदार अ‍ॅड. विलास खरात यांनी रामदेव यांची भेट घेऊन मोसंबी या फळपिकावर प्रक्रिया करणारा उद्योग जालना जिल्ह्यात सुरु करावा, अशी मागणी केली होती. या मागणीचा सकारात्मक पध्दतीने विचार करुन सायंकाळी शेतकरी मेळाव्यात प्रक्रिया उद्योगाची घोषणा केल्यामुळे अ‍ॅड. खरात यांनी स्वामी रामदेव बाबा यांचे आभार मानले.

Web Title: Farmers should give priority to organic farming - Ramdev Baba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.