कोल्हापुरी बंधा-यावरून पडून शेतक-याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:17 AM2017-12-18T01:17:30+5:302017-12-18T01:17:34+5:30

जळगाव सपकाळ येथील कोल्हापुरी बंधा-याचा स्लॅब खचून शेतक-याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. बाबूराव तुकाराम बुरकुले (५५) असे मृत शेतक-याचे नाव आहे.

Farmer's death due to falling from Kolhapuri barriage | कोल्हापुरी बंधा-यावरून पडून शेतक-याचा मृत्यू

कोल्हापुरी बंधा-यावरून पडून शेतक-याचा मृत्यू

googlenewsNext

भोकरदन : तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील कोल्हापुरी बंधा-याचा स्लॅब खचून शेतक-याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. बाबूराव तुकाराम बुरकुले (५५) असे मृत शेतक-याचे नाव आहे.
जि. प.ने जळगाव सपकाळ शिवारातील नदीवर वीस वर्षांपूर्वी कोल्हापुरी बंधारा बांधला होता. परिसरातील शेतकरी नदीपात्राऐवजी शेतात बंधा-यावरूनच जातात. बाबूराव तुकाराम बुरूकुले सकाळी शेताकडे जाण्यासाठी बंधा-यावरून जात असताना, अचानक बंधा-याचा स्लॅब ढासळल्याने बुरकुले उंचावरून खाली दगडावर आदळल्यामुळे त्यांना मार लागला. शेतक-यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी सिल्लोड येथे रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
जि.प.च्या दुर्लक्षामुळे मृत्यू
जळगाव सपकाळ येथील जिल्हा परिषदेच्या बंधा-याची दुरवस्था झाली असून, त्याची दुरुस्ती करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. मात्र, सिंचन विभागाने याकडे कायम दुर्लक्ष केले. परिणामी आज एका शेतक-याचा हकनाक बळी गेला. त्यास संबंधित अधिकारीच जबाबदार असल्याची संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Web Title: Farmer's death due to falling from Kolhapuri barriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.