भोकरदन तालुक्यात नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 05:05 PM2018-09-15T17:05:57+5:302018-09-15T17:06:56+5:30

तालुक्यातील पारध बु. येथे सततच्या नापिकीला कंटाळून शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.

Farmer suicides in Bhokardan taluka | भोकरदन तालुक्यात नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

भोकरदन तालुक्यात नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Next

भोकरदन (जालना ) : तालुक्यातील पारध बु. येथे सततच्या नापिकीला कंटाळून शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. अशोक अहेलुबा सपकाळ (३४) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील शेतकरी अशोक सपकाळ (वय. ३४, रा. धामणगाव, ता.जि. बुलढाणा) यांची पारध बु.शिवारात दोन एकर जमीन आहे.  मागील काही वर्षापासून पावसाअभावी शेतीत उत्पन्न नसल्याने सपकाळ निराश असत. यातूनच त्यांनी शुक्रवारी रात्री दहा ते साडेदहा वाजेच्या दरम्यान स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. 

याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यृची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण चौधरी, पो. हे. कॉ. एस. व्ही. गीते, पो. कॉ. सुरेश डुकरे, किशोर मोरे, दिनेश पायघन हे करत आहेत.

Web Title: Farmer suicides in Bhokardan taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.