मुदतवाढ; शेतकरी फिरकेना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:04 AM2019-03-11T00:04:06+5:302019-03-11T00:04:46+5:30

हमीभावाने तूर विक्रीसाठी आतापर्यंत जिल्ह्यातील सहा केंद्रांवर फक्त ४५० शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे, मात्र ८ मार्च रोजी नाफेडने तिसऱ्यांदा तूर नोंदणीसाठी मुदतवाढ जाहिर केली आहे.

Extension The farmer again ... | मुदतवाढ; शेतकरी फिरकेना...

मुदतवाढ; शेतकरी फिरकेना...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : हमीभावाने तूर विक्रीसाठी आतापर्यंत जिल्ह्यातील सहा केंद्रांवर फक्त ४५० शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे, मात्र ८ मार्च रोजी नाफेडने तिसऱ्यांदा तूर नोंदणीसाठी मुदतवाढ जाहिर केली आहे. आता २० मार्चपर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे.
शासनाने तुरीला ५६७५ रूपये हमीभाव जाहीर केला आहे. खुल्या बाजारात तुरीला ४८०० ते ५००० रूपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. हमीभावापेक्षा २०० ते ३०० रुपयांचा फरक असतांना अनेक शेतक-यांनी नोंदणीकडे पाठ फिरविली. शासनाला तूर विकल्यानंतर पैसे मिळण्यास दोन ते तीन महिने विलंब होत असल्याने शेतकरी हमीभाव केंद्राकडे फिरकतच नसल्याचे चित्र आहे. नोंदणीमध्ये वाढ व्हावी या उद्देशाने नाफेडने ८ मार्च रोजी पत्र काढून नोंदणीला २० मार्च पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
जिल्ह्यातील सहा केंद्रांवर आतापर्यत ४५० शेतक-यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. यामध्ये जालना २१०, भोकरदन ७०, अंबड ६०, तीर्थपुरी ४०, मंठा ४०, परतूर ३० आदी ४५० शेतक-यांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तुरीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.
यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यामुळे तूर विकून मिळेल त्या भावात शेतकरी तूर विकून मोकळे होत आहेत.
दुष्काळाचा फटका : शेतक-यांचे आर्थिक नुकसान
शासनाने तुरीला ५ हजार ६७५ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. सध्या हमीभावापेंक्षा २०० ते ३०० रूपये शेतक-यांना क्विंटलामागे कमी भाव मिळत आहे. दुष्काळ असल्याने शेतक-यांना नाईलाजाने तोटा सहन करावा लागत असल्याचे शेतकरी सांगत आहे. कारण हमीभाव केंद्रावर शेतमाल विक्री केल्यास दोन ते तीन महिने पैसे मिळत नसल्याने शेतक-यांची आर्थिक अडचण होत आहे. नाफेडने दहा दिवसाची मुदतवाढ दिल्याने नाफेडच्या केंद्रावर नोंदणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Web Title: Extension The farmer again ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.