राणी उंचेगाव येथे स्फोटकांचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 12:30 AM2019-03-26T00:30:26+5:302019-03-26T00:30:52+5:30

राणी उंचेगाव येथे रविवारी दुपारी दीड वाजेच्या दरम्यान एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये विहीर ब्लास्टिंगसाठी वापरण्यात येणाºया जिलेटीन स्फोटकांचा मोठा साठा जप्त करण्यात आला.

The explosives stock of Rani Uchangaon seized | राणी उंचेगाव येथे स्फोटकांचा साठा जप्त

राणी उंचेगाव येथे स्फोटकांचा साठा जप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात विविध ठिकाणी चेक पोस्ट माध्यमातून येणाऱ्या -जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याचे काम सध्या तालुक्यात सर्वत्र चालू असतानाच राणी उंचेगाव येथे रविवारी दुपारी दीड वाजेच्या दरम्यान एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये विहीर ब्लास्टिंगसाठी वापरण्यात येणाºया जिलेटीन स्फोटकांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी अंबड पोलिसांत चार जणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, अंबड तालुक्यातील राणी उंचेगाव येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेक पोस्टवर बैठे पथक नेमण्यात आले होते. त्यातील पथक प्रमुख नरेंद्र नागलवाड यांच्या पथकाने करड्या रंगाच्या स्कॉर्पिओ क्रमांक एम. ४ 0 ४ बी.डल्ब्यू-६८४६ या गाडीची तपासणी केली असता त्यात ही स्फोटके आढळून आली. एकूण आठ बॉक्स प्रत्येकी २५ किलो ग्रॅम प्रमाणे एकुण २०० किलो ग्रॅम स्फोटकांचा मोठा साठा असा एकूण पाच लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला. गौरव अशोक कुमार नानावटी (३१, रा.अमित हॉटेल जवाहर बाग पोलीस चौकीच्या पाठीमागे, नवीन जालना) हा त्याचे वडील अशोक कुमार नानावटी यांच्या नावे असलेल्या मॅगझिन हाऊसमधून आणून तो घनसावंगी तालुक्यातील बोडखा या गावी चंद्रकांत दत्तात्रय सपकाळ (रा.चिंचोडी पाटी जि. नगर) यांच्या विहिरीच्या खोदकामसाठी घेऊन जाताना आढळून आला. तेव्हा त्याच्या सोबत त्याचा नोकर उमेश रमेश खरात (२५ रा.खांडसरी नवीन जालना) हा देखील होता. नमूद लोकांकडे पथकाने संबंधित स्फोटकाच्या परवान्याबाबत विचारपूस केली असता, त्यांच्याकडे कसल्याही प्रकारची परवानगी किंवा लायसन्स नसल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी अंबड पोलिसांत पोलीस उपनिरीक्षक शैलेश शेजूळ यांच्या फिर्यादीवरुन आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्यातील आरोपी गौरव अशोक कुमार नानावटी आणि उमेश रमेश खरात यांना सोमवारी अंबड पोलिसांनी अंबड न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने २६ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Web Title: The explosives stock of Rani Uchangaon seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.