राजुरेश्वराचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:07 AM2018-01-22T00:07:47+5:302018-01-22T00:07:56+5:30

मराठवाड्याचे आराध्य दैवत राजुरेश्वर गणपतीचा जन्मोत्सव सोहळा रविवार हजारो भाविकांच्या उपस्थित उत्साहात साजरा झाला.

The enthusiasm of Rajureshwar's birth centenary celebrations | राजुरेश्वराचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात

राजुरेश्वराचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात

googlenewsNext

राजूर : मंत्राचा जयघोष, फटाक्यांची आतषबाजी व सनई चौघड्याच्या मंगलवाद्यात मराठवाड्याचे आराध्य दैवत राजुरेश्वर गणपतीचा जन्मोत्सव सोहळा रविवार हजारो भाविकांच्या उपस्थित उत्साहात साजरा झाला. काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली.
जन्मसोहळ्यानिमित्त आ. नारायण कुचे, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी, तहसीलदार तथा गणपती संस्थानाच्या अध्यक्ष योगिता कोल्हे व स्थानिक विश्वस्तांच्या हस्ते मंत्रोच्चारात सकाळी नऊ वाजता महापूजा अभिषेक करून श्री मूर्तीस वस्त्रालंकार चढविण्यात आले. दुपारी १२ वाजता महाआरती झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी व सनई चौघड्याच्या मंगल वाद्यात श्री जन्म सोहळ्याच्या भक्तिमय वातावरणाचा भक्तांनी अनुभव घेतला.
मंदिराच्या पायथ्याशी सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहाचा समारोप ह.भ.प. दयानंद महाराज सेलगावकर, आ.नारायण कुचे, भीमराव महाराज दळवी व सप्ताह समितीचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत व ह.भ.प.रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या काल्याच्या कीर्र्तनाने झाला. समारोपानंतर १११ क्विंंटल अन्नदानाच्या महाप्रसादाचा लाखो गणेश भक्तांनी लाभ घेतला.
या प्रसंगी के.आर.सोळंके यांनी राजूर येथे वारक-यांसाठी निवासस्थान उभारण्याची मागणी केली. यावेळी सप्ताहात ज्ञानदान, अन्नदान व योगदान देणा-या विविध संस्था व मान्यवरांचा सप्ताह समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. श्री जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांनी सप्ताहभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. सोहळ्यात महाराष्टÑातील नामवंत संत महंतांनी सोहळ्याला हजेरी लावून कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, अंधश्रध्दा, हुंडाबंदी, शैक्षणिक, स्वच्छता मोहीम समाजातील अनिष्ट परंपरेवर प्रहार करीत समाजप्रबोधन करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. या सोहळ्यासाठी साहेबराव भालेराव, माजी जि.प.अध्यक्ष रंगनाथ काळे, सरपंच भाऊसाहेब भुजंग, माजी सरपंच शिवाजी पुंगळे, सुधाकरराव दानवे, गजानन नागवे, माजी जि.प.सदस्य रामेश्वर सोनवणे, आशाताई साबळे, कैलास पुंगळे, व्यवस्थापक गणेशराव साबळे, उपसरपंच विनोद डवले, बाबूराव खरात, प्रशांत दानवे, शशिकांत शिंदे, भिकनराव पुंगळे, विष्णू राज्यकर, श्रीमंता पुंगळे, अण्णासाहेब भालेराव, संयोजक विष्णू महाराज सास्ते, जगन्नाथ थोटे, देवराव डवले, श्रीराम पंच पुंगळे, भगवान नागवे, राहुल दरक, ज्ञानेश्वर पुंगळे, विनायक जगताप, मुकेश अग्रवाल, नारायण पुंगळे, रामेश्वर टोणपे, कृष्णा जाधव, बबन मगरे यांनी पुढाकार घेतला.
--------------
पालखी मिरवणुकीचे स्वागत
शनिवारी रात्री ९ वाजता टाळमृदंगाच्या गजरात गावातून श्रीची पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी समोर भजनी मंडळ भजने गात तर बँण्डच्या तालावर युवक गुलालाची उधळण करीत गणरायाचा जयघोष केला. घरोघरी पालखीचे स्वागत करण्यात आले. स.पो.नि.किरण बिडवे यांच्यासह कर्मचा-यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: The enthusiasm of Rajureshwar's birth centenary celebrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.