ठळक मुद्देगौरव किरणकांत भरवाडा यांनी नागरिकांच्या तक्रारी व सुविधांसाठी असलेल्या पंतप्रधान कार्यालयाच्या पीएमओपीजी पोर्टलवर तक्रार केली होती. तक्रारीची दखल घेत प्राप्त निर्देशानुसार नगरपालिकेने शहरातील सरोजिनी रोडवरील सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमणे गुरुवारी हटवली. 

जालना : वारंवार तक्रार करूनही पालिका दखल घेत नसल्याने येथील एका नागरिकांनी पंतप्रधान कार्यालयाच्या ‘पीएमओपीजी’ या पंतप्रधान कार्यालयाच्या नागरी सुविधांसाठी असलेल्या वेबपोर्टलवर अतिक्रणाबाबत तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत प्राप्त निर्देशानुसार नगरपालिकेने शहरातील सरोजिनी रोडवरील सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमणे गुरुवारी हटवली. 

येथील गौरव किरणकांत भरवाडा यांनी नागरिकांच्या तक्रारी व सुविधांसाठी असलेल्या पंतप्रधान कार्यालयाच्या पीएमओपीजी पोर्टलवर तक्रार केली होती. आपल्या मेडील एजन्सीच्या एजन्सीच्या बाजूला असणा-या सार्वजनिक रस्त्यावर अवैधरीत्या दुकाने व टप-या थाटण्यात आल्याचे तक्रारी नमूद होते. भरवाडा यांच्या वेबपोर्टलवरील तक्रारीची दखल घेतल्यानंतर नगरपालिका प्रशासनाला सदर अतिक्रमण हटविण्याचे निर्देश प्राप्त झाले होते. त्यानुसार मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्या आदेशाने गुरुवारी सकाळी हे अतिक्रमण हटविण्यास पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाली. 

अतिक्रमण धारकांनी सुरुवातीला विरोध केला. मात्र, पोलिसांनी त्यांना कारवाईत अडथळा न आणण्याच्या सूचना केल्या. पालिकेच्या पथकाने एक जेसीबी आणि सहा ट्रॅक्टरच्या मदतीने येथील टपºया, पत्र्याचे शेड व अन्य दुकाने हटविली. विजया बँकेसमोरील अवैध दुकानेही पालिकेच्या पथकाने काढून टाकली. स्वच्छता विभागप्रमुख माधव जामधडे, स्वच्छता निरीक्षक लोंढे यांच्यासह १२५ पुरुष व महिला सफाई कामगार, दोन पोलीस निरीक्षक ६० महिला व पुरुष पोलीस कर्मचाºयांनी या कारवाईत सहभाग घेतला.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.