एकनाथ खडसे यांची जाफराबाद येथील न्यायालयात हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:34 AM2018-08-15T00:34:57+5:302018-08-15T00:35:13+5:30

जाफराबाद न्यायालयात माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या विरुध्द दाखल करण्यात आलेल्या शेतकरी विरुद्ध वक्तव्य प्रकरणाची उलट तपासणी करण्यात येऊन न्यायालयाने फिर्यादीची साक्ष नोंदवून घेतली.

Eknath Khadse in a court in Jafarabad | एकनाथ खडसे यांची जाफराबाद येथील न्यायालयात हजेरी

एकनाथ खडसे यांची जाफराबाद येथील न्यायालयात हजेरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : जाफराबाद न्यायालयात माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या विरुध्द दाखल करण्यात आलेल्या शेतकरी विरुद्ध वक्तव्य प्रकरणाची उलट तपासणी करण्यात येऊन न्यायालयाने फिर्यादीची साक्ष नोंदवून घेतली.
एकनाथ खडसे यांनी एका जाहीर सभेत शेतकऱ्याकडे मोबाईल रिचार्ज करण्यासाठी पैसे आहेत, परंतु वीज बिल भरणा करण्यासाठी नाही असे वक्तव्य केले होते. यामुळे शेतकºयांचा अवमान झाला आहे, असा आरोप करून एकनाथ खडसे यांच्याविरोधात जाफराबाद येथील शेतकरी सुरेश गवळी यांनी जाफराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जाफराबाद न्यायालयाने ३१ आॅगस्ट २०१७ रोजी माजी मंत्री एकनाथ खडसे यांना नोटीस बजावून जाफराबाद न्यायालयात हजर राहण्या विषयी समन्स बाजवले होते. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी जाफराबाद न्यायालयात हजर राहिले. यावेळी एकनाथ खडसे यांनी अ‍ॅड. रामेश्वर अंभोरे यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्यावेळेस पंधरा हजार रुपये दंड भरून खडसे यांना जामीन मंजूर केला होता.
यावेळी खडसे यांच्यासोबत न्यायालयात यावेळी गोविंद पंडित, सभापती साहेबराव कानडजे, भाऊसाहेब जाधव, सरपंच संतोष लोखंडे, सुरेश दिवटे, सुधीर पाटील, विजू परिहार, उद्धव दुनगहू, साहेबराव मोरे, विजय सोनवणे, दगडूबा गोरे, निवृत्ती दिवटे, सय्यद मतीन, अजीम शेख, अमोल पडघन, पिंटू वाकडे आदींची उपस्थिती होती.
मंगळवारी जाफराबाद न्यायालायत न्यायाधीश शैलेश चिकने यांच्या समोर माजी मंत्री एकनाथ खडसे आज हजर राहिले. मंगळवारी न्यायालयाने केवळ फिर्यादी पक्षाची उलट तपासणी घेतल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या खटल्याची पुढील सुनावणी ही १८ सप्टेंबरला होणार आहे.

Web Title: Eknath Khadse in a court in Jafarabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.