राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीमुळेच देश तंत्रज्ञानात अग्रेसर-गोरंट्याल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:02 AM2018-08-21T01:02:17+5:302018-08-21T01:02:36+5:30

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीमुळेच भारत आज तंत्रज्ञानात अग्रेसर असल्याचे प्रतिपादन माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी सोमवारी जालना शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

Due to the foresight of Rajiv Gandhi, the country is leading in technology- Gorontal | राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीमुळेच देश तंत्रज्ञानात अग्रेसर-गोरंट्याल

राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीमुळेच देश तंत्रज्ञानात अग्रेसर-गोरंट्याल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीमुळेच भारत आज तंत्रज्ञानात अग्रेसर असल्याचे प्रतिपादन माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी सोमवारी जालना शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर भांदरगे हे होते. तर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस कल्याण दळे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र राख, जिल्हा सरचिटणीस आलमखान पठाण, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष बदर चाऊस, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष आनंद लोखंडे, माजी नगरसेवक वैभव उगले, गोविंद बोराडे, संजय भगत, शिवराज जाधव, नदीम बांबूवाले आदींची उपस्थिती होती.
गोरंट्याल म्हणाले की, राजीव गांधी हे भारताचे पंतप्रधान असताना त्यांनी देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. माहिती व तंत्रज्ञान हा त्याचाच एक भाग असून माहिती तंत्रज्ञानाला दिलेल्या महत्वामुळेच आज भारताने विविध क्षेत्रात चौफेर प्रगती केली असून, जगाच्या पाठीवर भारताला तंत्रज्ञान क्षेत्रात नावलौकिक मिळवून दिला आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र राख यांनी केले. याप्रसंगी गणेश वाघमारे, जॉर्ज उगले, नदीम पहेलवान, आकाश लाखे, मनोज गुडेकर, गोपाल चित्राल, सी. के. डोईफोडे, म्हस्के, अफजल सौदागर, एहतेशाम मोमीन, अनिस चाऊस यांच्यासह काँग्रेस समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

Web Title: Due to the foresight of Rajiv Gandhi, the country is leading in technology- Gorontal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.