ठिबक सिंचनचे अनुदान गेले दुसऱ्याच खात्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 01:09 AM2018-05-25T01:09:23+5:302018-05-25T01:09:23+5:30

Drip irrigation grants went on to another account | ठिबक सिंचनचे अनुदान गेले दुसऱ्याच खात्यावर

ठिबक सिंचनचे अनुदान गेले दुसऱ्याच खात्यावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील कृषी विभागाच्या अनागोंदी कारभाराचा फटका अनेकदा शेतक-यांना बसत आहे. गोंदेगाव येथील एका महिला शेतक-याला ठिबक सिंचनसाठी मिळालेले ३९ हजारांचे अनुदान कृषी विभाग व बँकेच्या चुकीमुळे दुस-याच शेतक-याच्या खात्यावर जमा झाले आहे. त्यामुळे या शेतकरी महिलेवर कृषी कार्यालयात चकरा मारण्याची वेळ आली आहे.
मागील आर्थिक वर्षात जिल्ह्यातील सुमारे १५ हजारांवर शेतक-यांनी सूक्ष्मसिंचन योजनेअंतर्गत आॅनलाइन अर्ज केले होते. पैकी अनेक शेतक-यांचे अनुदान तांत्रिक चुकांमुळे बँक खात्यामध्ये जमा झाले नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. जालना तालुक्यातील गोंदेगाव येथील शेतकरी मथुराबाई सुभाष चवरे यांनी शेतात तीन एक द्राक्ष बागेची लागवड केली आहे. बागेला ठिबक केल्यानंतर अनुदानासाठी आॅनलाइन अर्ज केला. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अनुदानाच्या संचिकेसोबत जोडली. मात्र, कृषी विभागाच्या कर्मचाºयांनी मथुराबाई यांच्या नावासमोर अहंकारदेऊळगाव येथील अर्जुन डोईफोड या शेतक-यांचा बँक खाते क्रमांक टाकला. तीन महिन्यानंतर चूक लक्षात आल्यानंतर कृषी विभागाने शेतक-यांकडून खाते क्रमांक दुुरुस्तीसाठी अर्ज घेतला. मात्र, आवश्यक दुरुस्ती केली नाही. त्यामुळे या महिला शेतक-याचे ३८ हजार ८७८ रुपयांचे अनुदान पंजाब नॅशनल बँकेतून अहंकार देऊळगाव येथील डोईफोडे यांच्या खात्यावर जमा झाले. डोईफोडे यांनीही खातरजमा न करता पैसे काढून घेतले. आता कृषी विभागाने पंजाब नॅशनल बँकेस पत्र पाठवले असून, लाभार्थी शेतकरी व पैसे ज्या खात्यात जमा केले त्या शेतकºयाच्या नावात तफावत असताना खातरजमा न करता आरटीजीएस कसे केले याचा खुलासा करावा, असे पत्रात नमूद आहे.
एका शेतकºयाचे अनुदान दुस-याच्या खात्यावर जमा होण्याचे प्रकार वारंवार घडत, असून याबाबतच्या शेतक-यांच्या तक्रारी वाढल्या आहेत.

Web Title: Drip irrigation grants went on to another account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.