उद्या जालन्यात होणार ‘सरपंच अवॉर्ड’ पुरस्काराचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 01:16 AM2019-02-24T01:16:38+5:302019-02-24T01:16:43+5:30

संपूर्ण राज्य आणि जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड्स’ चे सोमवारी २५ फेब्रुवारी रोजी मधुर बॅक्वेट हॉल, दुर्गामाता रोड जालना येथे सकाळी साडेअकरा वाजता वितरण होणार आहे.

Distribution of 'Sarpanch Award' will be held in Jalna tomorrow | उद्या जालन्यात होणार ‘सरपंच अवॉर्ड’ पुरस्काराचे वितरण

उद्या जालन्यात होणार ‘सरपंच अवॉर्ड’ पुरस्काराचे वितरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : संपूर्ण राज्य आणि जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड्स’ चे सोमवारी २५ फेब्रुवारी रोजी मधुर बॅक्वेट हॉल, दुर्गामाता रोड जालना येथे सकाळी साडेअकरा वाजता वितरण होणार आहे.
ज्युरी मंडळाकडे जिल्ह्यातील सरपंचांचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहे.
गावाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या व त्या स्वप्नांना मूर्तरुप देण्यासाठी झटणा-या मेहनती व कर्तबगार विजेत्या संरपंचांना फळबाग तज्ज्ञ तथा गट शेतीचे प्रणेते डॉ. भगवान कापसे यांच्या हस्ते े‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, कृषीभूषण भगवान काळे, कृषीभूषण सीताबाई मोहिते, प्रमुख मार्गदर्शक कृषीभूषण उध्दव खेडेकर हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहे.
बीकेटी टायर्स या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक तर पतंजली आयुर्वेद सहप्रायोजक आहे.
सलग दुस-या वर्षीही या पुरस्कारांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. पुरस्कारासाठी प्रचंड चुरस आणि उत्सुकता निर्माण झाली आहे. या सोहळ््यास जिल्ह्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत’ च्या वतीने करण्यात आले आहे.
११ कॅटेगरी, दोन विशेष पुरस्कार
सरपंचांनी गावात जल, वीज, व्यवस्थापन, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण, प्रशासन- लोकसहभाग, रोजगार व कृषी या ११ कॅटेगरीत केलेल्या कामांची पाहणी करुन या प्रत्येक क्षेत्रासाठी पुरस्कार दिला जाणार आहे. याशिवाय उदयोन्मुख नेतृत्व आणि सरपंच आॅफ द इयर हे दोन विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे.
सरपंचांना उपस्थित राहण्याचे आवाहन
जालना येथे सरपंच अ‍ॅवॉर्ड कार्यक्रमाचे वितरण सोमवारी सकाळी ११.३० मधुर बॅक्वेट हॉल, दुर्गामाता रोड जालना (मशीन हॉस्पीटल समोर) येथे करण्यात येणार आहे. सरपंच अ‍ॅवॉर्डसाठी अर्ज भरलेल्या सरपंचांप्रमाणेच अन्य गावातील सरपंचांनाही सोहळ््यास उपस्थित राहता येणार आहे.

Web Title: Distribution of 'Sarpanch Award' will be held in Jalna tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.