तपोधाम भक्तिमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:33 AM2018-01-17T00:33:30+5:302018-01-17T00:33:51+5:30

कर्नाटक गजकेसरी प.पू. श्री गणेशलालजी म.सा. यांच्या ५६ व्या पुण्यतिथीचा सोहळा मंगळवारी येथील गुरुगणेश तपोधामात भक्तिभावाने पार पडला.

Devotional programmes in Tapodham | तपोधाम भक्तिमय

तपोधाम भक्तिमय

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कर्नाटक गजकेसरी प.पू. श्री गणेशलालजी म.सा. यांच्या ५६ व्या पुण्यतिथीचा सोहळा मंगळवारी येथील गुरुगणेश तपोधामात भक्तिभावाने पार पडला. देशभरातील ५० हजार भाविकांनी यानिमित्त शहरात हजेरी लावल्यामुळे तपोधामाला यात्रेचे स्वरूप आले होते. भव्य मंडप, पांढ-या पोशाखातील श्रावक, धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल यामुळे अवघे तपोधाम भक्तिमय बनल्याचे पाहावयास मिळाले.
सकाळी मंगल पठणाने गुरुगणेश गुणगान सभेला प्रारंभ झाला. पुण्यतिथी उत्सवासाठी औरंगाबादहून पायी दिंडीत सहभागी महिला भाविकांच्या हातातील १५० मीटर लांबीच्या ध्वजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गुणगान सभेत प.पू. श्री. सौरवमुनीजी यांची मंगलचरण सभा झाली.
या वेळी जैन श्रावक संघाचे महामंत्री स्वरुपचंद ललवाणी यांनी तपोधामांतर्गत राबविण्यात येणा-या विविध उपक्रम व प्रकल्पांची माहिती दिली.
मुख्य कार्यक्रमास उपस्थित पालकमंत्री बबनराव लोणीकर म्हणाले, की गुरुगणेश तपोधामाचा विकास करण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी शासनाकडून देण्यात आला आहे. येथील विकास कामांना आपण सहकार्य करू.
या वेळी साध्वी पंकजाश्रीजी म.सा., प.पू. पुण्यस्मिताजी म.सा यांनी उपस्थितांना उपदेश केला. जैन श्रावक संघाचे नरेंद्र लुणिया, संजयकुमार मुथा यांनी विचार मांडले. तपोधामाच्या विकास कामात सहकार्य करणा-या दानशूरांचा सत्कार करण्यात आला.
प.पू. विवेकमुनीजी म.सा. यांना कोटा संघ प्रमुख पदवी देऊन चादर ओढण्यात आली. त्याचबरारेबर प.पू. प्रतिभाजी म.सा. यांना कोटा संघ प्रवर्तनाची पदवी प्रदान करण्यात आली.
माजी आ. कैलास गोरंट्याल व नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी तपोधाम स्थळी उपस्थित राहून, येथील विकासाकरिता कायम प्रयत्नशील असल्याचे सांगितले. प.पू. सौरवमुनीजी म.सा. प.पू.प्रणवमुनीजी म.सा. प.पू. गौरव मुनीजी म.सा यांनी या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. नांदेडचे माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, जैन महामंत्री पारस मोदी, वीरेंद्र धोका, चेन्नई येथील उद्योगपती आनंद चांदणी यांनी प.पू. गणेशलालजी म.सा. यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
पुण्यतिथी सोहळ्यासाठी श्रावक संघाचे संघपती स्वरुपचंद रुणवाल, अध्यक्ष संजयकुमार मुथा, महामंत्री स्वरुपचंद ललवाणी, उपाध्यक्ष नरेंद्र लुणिया, कोषाध्यक्ष डॉ. गौतमचंद रुणवाल, सहसचिव विजयराज सुराणा, विश्वस्त सुरेशकुमार सकलेचा. डॉ. धरमचंद गादिया, कचरुलाल कुंकूलोळ, भरत गादिया, डॉ. कांतीलाल मांडोत, सुरजमल मुथा यांनी पुढाकार घेतला.

Web Title: Devotional programmes in Tapodham

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.