तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:47 AM2019-04-29T00:47:59+5:302019-04-29T00:48:23+5:30

अंबड तालुक्यातील चुर्मापुरी शिवाराला लगतच असलेल्या दयाळा शिवारात रविवारी सकाळी एका पंचवीस वर्षाच्या तरुणाचा बेवारस मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली

The dead body of the youth found | तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अंकुशनगर :  अंबड तालुक्यातील चुर्मापुरी शिवाराला लगतच असलेल्या दयाळा शिवारात रविवारी सकाळी एका पंचवीस वर्षाच्या तरुणाचा बेवारस मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. गोंदी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. बळीराम दत्तात्रय तुपे (रा.कोळघर ता. औरंगाबाद) असे मयताचे नाव आहे. घात की अपघात, याबाबत गोंदी पोलिसांनी शोध सुरु ेकेला आहे.
शेतकरी महादेव गारूळे यांना त्यांच्या गट क्रमांक पाच मध्ये कोणीतरी अनोळखी व्यक्ती पडलेली आढळून आली. त्यांनी याची माहिती तातडीने पोलिसांना दिली. मिळालेल्या माहितीवरुन तात्काळ गोंदी पोलिसांनी दयाळा शिवार गाठत मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला व मृतदेहाच्या अंगावरील पॅन्टमध्ये आधारकार्ड व शेजारी असलेल्या रस्त्यालगतच लाल रंगाची दुचाकी क्रमांक एम.एच. २० सी.एफ़ ४६८४ उभी असल्याने त्याची शहानिशा केली असताना शेतामध्ये पडलेल्या इसमाची ओळख पटली. बळीराम दत्तात्रय तुपे असे नाव आधारकार्डवर दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस सूत्रांनुसार दोन-तीन दिवसांपूर्वीच सदर इसम मयत झालेला असावा व विष प्राशन केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली होती. गोंदी पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वडीगोद्री येथे हलवला. पोलिसांनी नातेवाईकांना माहिती दिली. उत्तरीय तपासणी करून डॉक्टर काय अहवाल देतात तसेच कुटुंबिय व नातेवाईकांकडे विचारपुस करून घातपात किंवा आत्महत्येबाबत गोंदी पोलीस पुढील तपासाची दिशा ठरवणार आहेत.
घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे, सहाय्यक फौजदार सय्यद नसीर पो.का.योगेश दाभाडे सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. अशाच प्रकारे गेल्या दोन महिन्यांतील अशा प्रकारे मृतदेह आढळण्याची ही दुसरी घटना आहे. सदर व्यक्तीने आत्महत्या केली का कोणी त्याला विषारी द्रव पाजले, या दिशेने तपास करण्यात येत असल्याची माहिती गोंदी पोलिसांनी दिली.

Web Title: The dead body of the youth found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.