शेतकऱ्यांशिवाय देश चालू शकत नाही : आ. भाई जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 12:16 AM2018-10-12T00:16:21+5:302018-10-12T00:17:19+5:30

शेतक -यांशिवाय देश आणि राज्य चालू शकत नाही, केवळ खोटी आश्वासने व पोकळ घोषणा करणा-या या सरकारला आता शेतकरीच खाली खेचेल असा विश्वास काँग्रेसचे प्रवक्ते आ. भाई जगताप यांनी शेतकºयांच्या विराट मोर्चाला संबोधित करतांना व्यक्त केला.

Countries can not be run without farmers: come Brother Jagtap | शेतकऱ्यांशिवाय देश चालू शकत नाही : आ. भाई जगताप

शेतकऱ्यांशिवाय देश चालू शकत नाही : आ. भाई जगताप

Next
ठळक मुद्देसंघर्ष मोर्चाला शेतक-यांनी दिला मोठा प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : शेतक -यांशिवाय देश आणि राज्य चालू शकत नाही, केवळ खोटी आश्वासने व पोकळ घोषणा करणा-या या सरकारला आता शेतकरीच खाली खेचेल असा विश्वास काँग्रेसचे प्रवक्ते आ. भाई जगताप यांनी शेतकºयांच्या विराट मोर्चाला संबोधित करतांना व्यक्त केला.
परतूर येथे जालना जिल्हा काँग्रेसचे कमिटीचे अध्यक्ष मा. आ. सुरेशकुमार जेथलिया यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय कार्यालयावर भव्य शेतकरी संघर्ष मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रमुख म्हणुन माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, माजी खा. मतुकाराम रेंगे, रा. कॉ. प्रदेश सरचिटणीस बळीराम कडपे, राजाभाऊ देशमुख, अ‍ॅड. अन्वर देशमुख, राजेश राठोड, शेख महेमुद, राजेंद्र राख, किसन मोरे, निळकंठ वायाळे हे होते.
पुढे बोलताना आ. जगताप म्हणाले की, आपले गणीत चुकल्याने विरोधकांनी डाव साधला. यांची सत्ता चुकून आल्याने हे असेच वागणार. आज शेतकरी स्वत: ला संपवायला लागला आहे. त्याची दखल घ्यायला हे शासन तयार नाही. चार वर्षात या सरकारने केवळ आश्वासन व पोकळ घोषणा केल्या, प्रत्यक्षात कोणालाच काही दिले नाही. या जॅकेट वाल्या सरकारने शेतकरी व सर्वसामान्यांच्या भावनांचा चक्काचुर केला. चार वर्षात या सरकारने आम्ही आणलेल्या योजनांचे उद्घाटन आणि भाषणच केली. या सरकारन चोरांना कर्ज दिले. महागाई वाढली. शेतकºयांच्या मालाला भाव नाही, तुर बोंडआळीचे पैसे नाही, कर्जमाफी ही फसवी निघाली. गॅस, पट्रोल, डीझेलसह इतर सर्वच वस्तूचे भाव गगनाला नेवून भिडवले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सुरेश कुमार जेथलीया म्हणाले की, या सरकार मधील मंत्र्यांनी सत्तेत येण्यासाठी अनेक मोर्चे काढले. आता मात्र सत्तेत आल्यावर सर्व विसरून गेले. या सरकारच्या सर्व घोषणा सर्व कागदावरच आहे. त्यामुळे येणाºया काळात सरकार पडल्या शिवाय राहणार नाही.
या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. याप्रसंगी गणेश बोराडे, जि. प. सदस्य घनवट, अखिल काजी, राजेश भुजबळ, रहेमु कुरेशी विजय जºहाड, अण्णासाहेब खंदारे यांच्यास कार्यकर्ते उपस्थित होते.
परतूर : शेतकरीच धडा शिकवतील
शेतकºयांना कोणतेच अनूदान मिळाले नाही, कर्जमाफीत शेतकºयांना फायदा झाला नाही. आमच्या पालकमंत्र्याच्या लोणी या गावातच शेतकºयांने आज आत्महत्या केली, इतर गावातील आत्महत्या हे काय रोखणार. केवळ बैठका व बदला घेण्याचे राजकारण आमचे पालकमंत्री करीत असल्याचे सांगून या सरकारला धडा आता आमचा शेतकरी बांधवच क रेल असेही मा. आ. जेथलिया यांनी सांगीतले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेश सरचिटणीस बळीराम कडपे, भाउसाहेब गोरे यांनी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्यावर टिका करीत स्थानिक प्रश्न मांडले. यावेळी नितीन जेथलिया यांनी प्रास्ताविक केले.

Web Title: Countries can not be run without farmers: come Brother Jagtap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.