केंद्रीय पथक आज जालना दौऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 12:47 AM2018-12-05T00:47:12+5:302018-12-05T00:47:28+5:30

दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक बुधवारी दौ-यावर येत आहे.

Central team visits today on Jalna | केंद्रीय पथक आज जालना दौऱ्यावर

केंद्रीय पथक आज जालना दौऱ्यावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक बुधवारी दौ-यावर येत आहे. या पथकातील अधिकारी हे मंगळवारी रात्रीच शासकीय विश्राम गृहात दाखल झाले होते. यावेळी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती माहिती पीपटीच्या माध्यमातून जाणून घेतली.
हे पथक मंगळवारी प्रथम बदनापूर तालुक्यातील जवसगाव येथे भेट देऊन पाहणी करणार असून, नंतर हे पथक जालना तालुक्यातील बेथलम येथे जाणार असल्याचे सांगण्यात आले.
या पथकात निती आयोगाचे सहसल्लागार मानस चौधरी, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयाचे एस.सी. शर्मा, आणि ग्रामीण विकास मंत्रालयाचे अवर सचिव व एस.एन.मिश्रा यांचा समावेश असून या पथकासमवेत राज्याचे कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव सुभाष उमराणीकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचीही उपस्थिती राहणार आहे. यावेळी कृृषी अधीक्षक विजय माईनकर यांचीही उपस्थिती राहणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Central team visits today on Jalna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.