भरधाव कारचे टायर तुटले; चालक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:43 AM2018-11-20T00:43:01+5:302018-11-20T00:43:18+5:30

ट्रक आणि एका कारची समोरा-समोर धडक होऊन भरधाव कारचे टायर तुटून चालक गंभीर जखमी झाला

Car tire breaks; The driver seriously injured | भरधाव कारचे टायर तुटले; चालक गंभीर जखमी

भरधाव कारचे टायर तुटले; चालक गंभीर जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड : ट्रक आणि एका कारची समोरा-समोर धडक होऊन भरधाव कारचे टायर तुटून चालक गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी सकाळी आठ वाजता शहागड जवळ औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर घडली.
ट्रक क्र. जी.जे. ३६ .टी.३१८८ बीडहून औरंगाबाद कडे जात असताना औरंगाबादहून बीडकडे जाणाऱ्या कार क्रमांक एम.एच.१९.बीयु. ६६४२ कारने भरधाव वेगात ट्रकला उजवी कडून जोराची धडक दिली, धडक जोराची असल्याने कारचे समोरचे चाक तुटून कार रोडच्या विरूद्ध दिशेला फेकली गेली. सुदैवाने समोरून वाहन आले नसल्याने मोठा अनर्थ टळला. जोराची धडक बसल्याने कार चालक जखमी झाला. अपघात घडताच सामाजिक कार्यकर्ते अशफाक शहा आदींनी जखमी चालकाला प्रथमोपचारासाठी पाठवले, लक्ष्मण धोत्रे, विनायक शिंदे यांनी मदत केली. या अपघातामुळे वाहतूक ठप्प होती. कारचालकाचे नाव समजू शकले नाही.

Web Title: Car tire breaks; The driver seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.