चंदनझिऱ्यात बँक फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:45 AM2019-01-18T00:45:40+5:302019-01-18T00:45:53+5:30

जालना शहरातील चंदनझिरा येथील मंठा अर्बन को.आॅपरेटिव्ह बँकेच्या शाखेत बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला.

Attempt of theft in bank | चंदनझिऱ्यात बँक फोडली

चंदनझिऱ्यात बँक फोडली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंदनझिरा : जालना शहरातील चंदनझिरा येथील मंठा अर्बन को.आॅपरेटिव्ह बँकेच्या शाखेत बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, बँकेत काहीच न मिळाल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले.
नेहमीप्रमाणे बँकची कामे उरकून बँक कर्मचारी बुधवारी सायंकाळी बँक बंद करुन घरी गेले. मध्यरात्री बँकेचे शटर उचकटून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला. बँकेत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बँक व्यवस्थापकाच्या दलनाची झडती घेतली. मात्र, येथेही चोरट्यांना काहीच मिळाले नसल्याने दालनामध्ये असलेले डी. व्ही. आर. चोरून नेला. बँकेची तिजोरी मजबूत व सुरक्षित असल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले. सोमवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा केला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. राजेंद्रसिंह गौर यांनी घटनास्थळी भेट दिली.
चंदनझिरा पोलीस ठाण्यात आबासाहेब कचरू भोसले यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.हे.कॉ. शीलवंत करीत असल्याची माहिती ठाणे अंमलदार वाघमारे यांनी दिली.
पुरावे मिटविण्यासाठी डीव्हीआर चोरला
बँकेत काहीच न सापडल्यामुळे चोरट्यांना माघारी जावे लागले. परंतु, चोरट्यांनी जातात पुरावे मिटवण्यासाठी बँकेत असलेले सीसीटीव्ही कॅमेर फोडले. व मुख्य व्यवस्थापकाच्या दालनात असलेला डीव्हीआर चोरट्यांनी चोरुन नेला. दरम्यान, पुरावे मिटवल्याने पोलिसांना तपासात अडचणी येत आहेत.

Web Title: Attempt of theft in bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.