दानवे-खोतकरांमध्ये शस्त्रसंधी की, आमना-सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 12:51 AM2019-02-04T00:51:13+5:302019-02-04T00:52:23+5:30

गेल्या सहा महिन्यांपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकरांमधून अडवा विस्तवही जात नव्हता, परंतु रविवारी हे दोघेजण युती धर्म पाळतांना दिसून आले. ही दानवे आणि खोतकरांमधील शस्त्रसंधी म्हणावी की, आगामी लोकसभा निवडणुकीत ते आमने-सामने उभे राहून सरळ दोन हात करतात याकडे भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.

Armed with a gunfight with the demons, face-to-face | दानवे-खोतकरांमध्ये शस्त्रसंधी की, आमना-सामना

दानवे-खोतकरांमध्ये शस्त्रसंधी की, आमना-सामना

googlenewsNext

संजय देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गेल्या सहा महिन्यांपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकरांमधून अडवा विस्तवही जात नव्हता, परंतु रविवारी हे दोघेजण युती धर्म पाळतांना दिसून आले. ही दानवे आणि खोतकरांमधील शस्त्रसंधी म्हणावी की, आगामी लोकसभा निवडणुकीत ते आमने-सामने उभे राहून सरळ दोन हात करतात याकडे भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. आज आ. सत्तार यांनी देखील पशुसंवर्धन प्रदर्शनास भेट देऊन खा. दानवेंचा नामोल्लेख न करता थेट हम आपे साथ साथ असल्याचे सांगितले. तर परभणीचे खा. बूंडभाऊ जाधव यांनी देखील आता खोतकर मैदानात उतरले असून, त्यांना आमचीही साथ राहील असे सांगितल्याने रविवार हा जालनेकरांसाठी राजकीय तर्कविर्तकांचा ठरला.
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या जालना लोकसभेच्या निवडणुकीत आजच्या दानवे आणि खोतकरांच्या एका व्यासपीठावर येण्याने दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आवाक् झाले. एकूणच दानेवेंच्या विरोधात शड्डू ठोकणारे अर्जुन खोतकर यांच्या लोकसभा निवडणुकीत दानवेंना आव्हान देण्याच्या वल्गनांनी जालना जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. दानवे आणि खोतकरांमध्ये राजकीय मुद्यांवरून यापूर्वीही बरेचदा वाद झाले होते. मात्र नंतर पुन्हा दोघांनीही दोन पावले मागे येत ते दूर केले. परंतु गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून राज्यमंत्री खोतकर यांनी थेट लोकसभेची तयारी केल्याने दानवेंकडूनही त्यांच्यापेक्षा जास्त जमवा-जमव केली जात आहे. आजच्या भेटीतून मनोमिलन झाले काय असे राज्यमंत्री खोतकरांना विचारले असता, तसे काहीही नसल्याचे सांगून ज्या पशु प्रदर्शनाला लाखो लोक भेट असल्याने दानवेंना येणे क्रमप्राप्त झाल्याचे ते म्हणाले. परंतु असे असले तरी दानवेंनकडूनही या वृत्ताला दुजोरा देण्यात आला असून, आगामी काळात खोतकर हे काँग्रेसमध्ये जाऊन दानेवेंना आव्हान देणार या दृष्टीनेच खा. दानवेंकडून मोर्चेबांधणी करण्यात येणार आहे. काँग्रेसकडून सध्या कुठल्या नवीन नावाची चर्चा देखील सुरू नसल्याने दानवेंच्या अंदाजाला बळ मिळत असल्याचे दिसून येते. तसेच अर्जुन खोतकरांचे निकटवर्तीय देखील खासगीत भेटल्यावर एकमेकांना जय हो... करतांना दिसत असल्याने आता खोतकरांच्या काँग्रेस प्रवेशाची केवळ एक औपचारिकता शिल्लक असल्याचे भाजपच्या गोटातून सांगितले जात आहे.
गुपित कधी एकदा बाहेर पडते ?
खोतकरांच्या पोटातील पाणी सध्या हलत नसल्याने शिवसेना तसेच काँग्रेस आणि भाजपही संभ्रमित झाला आहे. खोतकरांचे पत्ते कधी खूले होणार या बाबत वेट अँड वॉच चे धोरण त्यांच्याकडून स्विकारले जात आहे. त्यातील गुपित कधी एकदा बाहेर पडते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहेत. खोतकरांनी गेल्या तीन महिन्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा, भीम महोत्सव, आणि आता राष्ट्रीय पातळीवरील पशू-पक्षी प्रदर्शनाचे आयोजन करून मोठी प्रसिध्दी आणि आपुलकी मिळविली आहे. त्यामुळे अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातील वाद राजकीय युध्दात बदलतो की, भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधी सारखाच ठरतो याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.

Web Title: Armed with a gunfight with the demons, face-to-face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.