अर्जुन खोतकरांची साथ मिळाल्याने रावसाहेब दानवेंना जालना विधानसभा मतदारसंघातून मिळाला पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 01:22 AM2019-05-24T01:22:14+5:302019-05-24T01:23:21+5:30

मोदी लाट आणि सेना -भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दाखविलेल्या एकजुटीमुळेच हा विजय सुकर झाल्याचे बोलले जात आहे.

Arjun Khotkar's association with Rao Saheb Danwe becomes deciding factor | अर्जुन खोतकरांची साथ मिळाल्याने रावसाहेब दानवेंना जालना विधानसभा मतदारसंघातून मिळाला पाठिंबा

अर्जुन खोतकरांची साथ मिळाल्याने रावसाहेब दानवेंना जालना विधानसभा मतदारसंघातून मिळाला पाठिंबा

Next

जालना विधानसभा मतदारसंघातून भाजपा सेना युतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या पारड्यात भरभरुन मतदान करुन पुन्हा विजयाची माळ त्यांच्या गळ्यात घातली. मोदी लाट आणि सेना -भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दाखविलेल्या एकजुटीमुळेच हा विजय सुकर झाल्याचे बोलले जात आहे. यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत याचा फायदा निश्चितच युतीच्या उमेदवारांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जालना विधानसभेचा विचार केला असता १९९० पासून शिवसेनचे अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांच्यातच प्रामुख्याने लढत्या झाल्या त्यात १९९० मध्ये अर्जुन खोतकर हे विजयी झाले होते. पहिल्या निवडणुकीत गोरंट्याल ऐवजी माणिकचंद बोथरा हे होते. १९९५ नंतर मात्र अर्जुन खोतकर आणि कैलास गोरंट्याल यांत रंगत असे, याला २००९ चा अपवाद म्हणावा लागेल २००९ मध्ये अर्जुन खोतकर हे घनसावंगी विधानसभा मतदार संघातून लढले तेथे त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश टोपे यांनी पराभव केला. तर जालना विधानसभा मतदार संघात माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर आणि कैलास गोरंट्याल यांच्यात थेट लढत झाली होती. यावेळी गोरंट्याल यांनी विजय मिळविला होता. २०१४ साली झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा कैलास गोरंट्याल विरुध्द अर्जुन खोतकर यांच्यात लढत झाली. त्यात खोतकर यांचा केवळ २९६ मतांनी विजय झाला होता. त्यातच आता लोकसभा निवडणुकीत सुरुवातीला सेना -भाजपाच्या युतीवरुन झालेला ताणतणाव आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी दंड थोपटले होते. यामुळे अर्ज करण्याच्याा शेवटच्या क्षणापर्यंत धुसफूस दिसून आली. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली दिलजमाई कामी आली. अर्जुन खोतकर यांनी युतीचा धर्म पाळून रावसाहेब दानवे यांना जालना विधानसभा मतदार संघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे आश्वासन दिले होते. त्यातून नुसार संघटनात्मक बांधणी करुन जालना विधानसभासह इतर भोकरदन, बदनापूर, सिल्लोड, पैठण, परिसरातही प्रचार करुन दानवे यांना विजयी मार्ग सुकर केला. निवडणूक त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई होती. या निकालामुळे काहींची चिंता दूर झाली, तर काहींची चिंता वाढली आहे.

की फॅक्टर काय ठरला?
जालना शहरातील झालेली विकास कामे हा यावेळी सर्वांत महत्वाचा मुद्दा ठरला. त्यात शहरातील सिमेंट रस्त्यांचा समावेश.
लोकसभा निवडणुकीच्या मैदानात राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी उडी घेण्याचे ठरविले. त्यावरून बराच खल झाला होता.
भाजपा, सेना युतीतील एकोपा आणि मनोमिलन किती दिवस टिकते हे ही महत्वाचे ठरणार आहे. यामुळे राजकीय परिस्थिती कशी होईल हे आताच सांगणे योग्य नाही.

Web Title: Arjun Khotkar's association with Rao Saheb Danwe becomes deciding factor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.