लोकसभा निवडणूक निकलानंतर जि.प.मध्ये सत्तांतराची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 01:10 AM2019-05-17T01:10:47+5:302019-05-17T01:11:25+5:30

राज्याच्या सत्तेत गळ्यात गळे घालून फिरत असतानाच शिवसेनेने भाजपला लक्ष्य केले होते. या पार्श्वभूमीवर जालन्यातही त्याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दिसून आले.

After the election of Lok Sabha elections, the possibility of power in ZP | लोकसभा निवडणूक निकलानंतर जि.प.मध्ये सत्तांतराची शक्यता

लोकसभा निवडणूक निकलानंतर जि.प.मध्ये सत्तांतराची शक्यता

Next

संजय देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राज्याच्या सत्तेत गळ्यात गळे घालून फिरत असतानाच शिवसेनेने भाजपला लक्ष्य केले होते. या पार्श्वभूमीवर जालन्यातही त्याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दिसून आले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना हे स्वतंत्र लढले. मात्र नंतर त्यांचे संख्या बळ हे बहुमताच्या जवळ होते. मात्र, शिवसेनेने भाजपच्या नेतृत्वाला धडा शिकविण्यासाठी शिवसेनेने हातावर घड्याळ बांधले. त्यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे शिवसेनेचे अनिरूध्द खोतकर तर उपाध्यक्ष सतीश टोपे यांच्याकडे चालून आले. भाजपचे संख्या बळ हे शिवसेनेच्या तुलनेत जास्त असल्याने भाजपने अध्यक्षपदावर दावा केला होता.
जालना जिल्हा परिषदेत काही मोजका काळ वगळता शिवेना-भाजपचे वर्चस्व राहिले आहे. त्यातही अनिरूध्द खोतकर आणि जिल्हा परिषद हे समीकरणच बनले आहे. कुठलीही जोड-तोड केली तरी अनिरूध्द खोतकर हे एक तर अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष राहिले आहेत. दरम्यान, शिवसेना - भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी युती झाली होती. त्यामुळे तेव्हाच शिवसेना राष्ट्रवादीचे घड्याळ हातातून काढेल असे वाटले होते. परंतु तसे झाले नाही. मध्यंतरी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. परंतु यात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मध्यस्थी केल्याने खोतकर यांनी माघार घेत, दानवेंचा प्रचार केला.
आता लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. दानवे हे पुन्हा विजयी होतील, या आशेवर शिवसेना आणि भाजपने जिल्हा परिषदेसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. काही चमत्कार होऊन येथे कॉग्रेसला संधी मिळाल्यास महत्वाची स्थानिक स्वराज्य संस्था तरी आपल्या ताब्यात राहावी म्हणून भाजप आणि श्विसेना नेतृत्वाकडून चाचपणी केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जि.प. अध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांनी भोकरदन येथील दानवेंच्या निवासस्थानी भेट देऊन व्यूहरचना आखल्याचे बोलले जात आहे. यावेळी भाजपला अध्यक्षाची संधी देऊन अनिरूध्द खोतकर हे उपाध्यक्ष पदावर समाधान मानतील, असे समीकरणही ठरल्याची जोरदार चर्चा आहे.
निकालाकडे लागले जालनेकरांचे लक्ष, तर्क-वितर्कांना उधाण
जस-जशी २३ मे जवळ येत आहे, तशी निकालाविषयी जोरदार चर्चा रंगत आहेत. कोणाला कुठून प्लस आणि कोणाला आघाडी मिळाली या बद्दल जो तो आपल्या परीने तर्क-वितर्क लावताना दिसून येत आहेत. पैठण, फुलंब्री बदनापूर येथे काँग्रेसला चांगले मतदान झाल्याचे बोलले जात आहे. तर जालना शहरासह विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरल्याने उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. आता मतमोजणीला केवळ पाच दिवस शिल्लक असताना जिल्हा परिषदेतील या सत्तांतराच्या चर्चेला महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान गेल्या पाच वर्षाचा कालावधी लक्षात घेतल्यास राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाने भाजपवर प्रखर टीकेचे बाण सोडल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे आ. राजेश टोपे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची मध्यवर्ती बँकेतील युतीही सर्वश्रुत आहे. आज शिवसेनेने जिल्हा परिषदेत काँग्रेसचीही अप्रत्यक्षपणे साथ घेतलेली आहे.

Web Title: After the election of Lok Sabha elections, the possibility of power in ZP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.