कर्तव्यात कसूर केल्यास कारवाई- केंद्रेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:35 AM2019-02-21T00:35:40+5:302019-02-21T00:36:13+5:30

सर्वसामान्यांचे जीवन सुकर होण्यासाठी शासनाच्या विविध योजना सूक्ष्म नियोजन करुन कल्पकतेने राबविण्याचे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले.

Action taken due to failure of the duties - Central Government | कर्तव्यात कसूर केल्यास कारवाई- केंद्रेकर

कर्तव्यात कसूर केल्यास कारवाई- केंद्रेकर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे. निवडणुकीच्या कामात हयगय अथवा दिरंगाई करणा-या अधिकारी, कर्मचा-यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने मजुरांच्या हाताला काम, पिण्याला पाणी व जनावरांना चारा उपलब्धतेबरोबरच दुष्काळी परिस्थिती ही संधी समजून सर्वसामान्यांचे जीवन सुकर होण्यासाठी शासनाच्या विविध योजना सूक्ष्म नियोजन करुन कल्पकतेने राबविण्याचे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आगामी लोकसभा निवडणूक, दुष्काळी परिस्थिती, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, एमआरईजीएस यासह विविध योजनांचा आढावा विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी आयोजित बैठकीत उपस्थित अधिका-यांकडून घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अपर जिल्हाधिकारी पी.बी. खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संगीता सानप, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) कमलाकर फड, जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर, उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
निवडणूक विषयक आढावा घेताना विभागीय आयुक्त केंद्रेकर म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी यंत्रणेने सज्ज रहावे. निवडणुकीसाठी स्थापन करण्यात येणा-या बुथच्या ठिकाणी पाणी, वीज, रँप यासारख्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. येत्या एक आठवड्यात जिल्ह्यातील सर्व बुथ तयार असतील या दृष्टिकोनातून अधिकाºयांनी काम करावे. निवडणुकांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून निवडणुका शांततेत व सुरळीतपणे होण्यासाठी निवडणुकांमध्ये बाधा ठरणाºया गुन्हेगारांवर पोलीस विभागाने आवश्यक ती कारवाई करावी. निवडणुकांमध्ये अधिकाºयांना देण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पडेल याबाबत दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना लागू केली असून, पात्र शेतकरी कुटूंबाच्या याद्या संकलित करुन पाठविण्याचे शासनाने निर्देश दिलेले आहेत. या कामात जिल्ह्यातील अधिका-यांनी वैयक्तिक लक्ष घालून आवश्यक ती माहिती संकलित करण्यात यावी. हे काम वेगाने होईल यादृष्टीने अधिका-यांनी प्रयत्न करण्याच्या सूचना करत दुष्काळी अनुदानापोटी शेतक-यांना द्यावयाच्या अनुदानाच्या कामाचाही वेग वाढविण्यात यावा व कमी वेळात अधिकाधिक शेतक-यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. यावेळी खपले यांची केंद्रेकर यांनी चांगलीच कानउघाडणी केली.
सूचना : रस्त्याची कामे रोहयोमार्फत करा
टंचाईच्या अनुषंगाने जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मागेल त्याला काम उपलब्ध करुन देण्याबरोबरच ग्रामीण भागात रस्त्यांची कामे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातुन करण्याला प्राधान्य देण्यात यावे. मागणीनुसार टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा. टँकरद्वारे पाणी पुरवठा करताना प्रत्येक टँकरवर जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी. टँकरद्वारे करण्यात येणा-या पाणीपुरवठ्यासाठी पाण्याचा उदभव जवळच असेल याची खातरजमा करुन घेण्यात यावी. तसेच सामूहिक विहिरींना मंजुरी देऊन ही कामे त्वरेने करण्यात यावीत. टँकरद्वारे करण्यात येणारा पाणी पुरवठा पारदर्शीपणे होतो आहे किंवा नाही, याची अधिकाºयांनी प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचनाही यावेळी केंद्रेकर यांनी दिल्या.

Web Title: Action taken due to failure of the duties - Central Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.