परतुरात वाळूतस्करांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:32 AM2019-01-23T00:32:32+5:302019-01-23T00:33:01+5:30

तालुक्यातील दुधना नदी पात्रात सोमवारी रात्री पोलिसांनी कारवाई करत एक ट्रॅक्टर जप्त केले.

Action against sand smugglers | परतुरात वाळूतस्करांवर कारवाई

परतुरात वाळूतस्करांवर कारवाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : तालुक्यातील दुधना नदी पात्रात सोमवारी रात्री पोलिसांनी कारवाई करत एक ट्रॅक्टर जप्त केले.
परतुर तालुक्यातील दुधना व गोदावरीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी होत आहे. यावर लगाम घालण्यासाठी पोलीस व महसूल पथकाच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. सोमवारी रात्री वडगाव जवळील दुधना नदीपात्रातून अवैध वाळूची तस्कारी करणाऱ्या टँक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, टँक्टर चालकाने पळ काढला. याप्रकरणी ट्रॅक्टर मालक मालिक कुरेशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक पवार, पोउपनि. बाळासाहेब जाधव, पोहेकॉ. चव्हाण, वैद्य, दुभाळकर, शिवाजी बहिरवाड, पाचरने यांनी केली.
याचवेळी दुधना नदी पात्रात अंधाराचा फायदा घेत चोरीच्या उदेशाने दबा धरून बसलेल्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. राजू नारायण मुजमुले (२२), अतुल नारायण साठे (२८), जिजाभाऊ भीकाराम ताठे १९ (सर्व रा. नान्द्रा, ता. परतूर) अशी संशयित आरोपींची नावे आहे. याप्रकरणी पोउपनि. बाळा साहेब जाधव यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रक पकडला
शहागड : अंबड तालुक्यातील आपेगाव येथील गोदावरी नदीपात्रातून सोमवारी रात्री अवैध वाळू भरून आयशर (एम.एच.०४ सी.ए.६५५१) औरंगाबादकडे जात असताना तहसीलदार किशोर देशमुख यांनी पकडला. तहसीलदार हे आपल्या पथकासह गस्तीवर असताना आपेगावहून औरंगाबादकडे जाणारा आयशर साष्टपिंपळगाव येथे अवैधवाळू सह पकडला. दरम्यान, आयशर जप्त करण्यात आला आहे.
वाळू उत्खनन करणारे ट्रॅक्टर पकडले
मठपिंपळगाव : येथील दुधना नदीच्या पात्रात मंगळवारी सकाळी सहा वाजता सर्जेराव ज्ञानदेव खंडेकर (रा. काजळा, ता.बदनापूर) यांचे ट्रॅक्टर अवैधरीत्या वाळू उत्खनन करत असताना मठपिंपळगाव सजाचे तलाठी के. डी. इंगळे यांनी पकडले. त्याचा पंचनामा तलाठी व मंडळ अधिकारी इ.सी.सोनवणे यांनी केला.
सदरील ट्रॅक्टर अंबड येथील तहसील कार्यालयात पुढील कारवाईसाठी नेत असताना पारनेर पंपाजवळून गोविंदपूरच्या दिशेने धूम ठोकली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. मठ पिंपळगाव व परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूउपसा सुरू असून, याकडे लक्ष देण्याची मागणी गावक-यांनी केली आहे. पंचनाम्यावर बळीराम जिगे, कैलास जिगे, बाबासाहेब जिगे, नंदकुमार जिगे, दादासाहेब जिगे आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

Web Title: Action against sand smugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.